राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली
परभणी/गंगाखेड (Sharad Pawar) : तालुक्याचे भूमिपुत्र सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर (B.R. Kundgir) यांनी दि. २१ ऑगस्ट रोजी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत रा.काँ. पक्षात मुंबई येथे प्रवेश घेतल्याने गंगाखेड विधानसभा मतदार संघात (National Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद वाढली आहे.
विधानसभा निवडणुक (Gangakhed Assembly) अगदी तोंडावर आली असताना राज्यातील सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांत आपली ताकद वाढविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदार संघातून (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या करूनाताई कुंडगीर यांचे पती सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर (B.R. Kundgir) यांनी दि. २१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, भुषणसिंह राजे होळकर, जिल्हाध्यक्ष मा.आ. विजयराव गव्हाणे, भीमराव हत्तीआंबिरे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील बोथी गावाचे रहिवासी असलेल्या बी.आर. कुंडगीर यांचा मुलगा अभय कुंडगीर यांच्याकडे सरपंच पद असल्याने व जिल्हा परिषद सदस्या असलेल्या सौ. करूनाताई कुंडगीर यांनी गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवून २९ हजाराच्या जवळपास मते घेतली होती. गंगाखेड विधानसभेत स्थानिक पातळीवर राजकीय पकड असलेल्या सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर (B.R. Kundgir) यांच्या पक्ष प्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघात महविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.
ताकदी बरोबर उमेदवारीसाठी स्पर्धा ही वाढणार
गंगाखेड विधानसभा मतदार संघावर (Gangakhed Assembly) महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या (National Congress) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आपला हक्क दाखविला असून ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शरदचंद्र पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातच गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माजी सभापती रविकांत उर्फ बाळ काका चौधरी, सुशांत चौधरी, माजी सभापती बालासाहेब निरस, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर (B.R. Kundgir) यांच्या सारख्या दिग्गजांनी प्रवेश केल्यामुळे राजकीय ताकद वाढण्याबरोबर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मा.आ. सिताराम घनदाट मामा, बालासाहेब निरस, रविकांत उर्फ बाळ काका चौधरी व बी.आर. कुंडगीर यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा ही वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलल्या जाते.