नाशिक(Nashik):- महा ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा), पुणे (Pune)या सेंद्रिय तसेच अवशेष मुक्त शेतीला चालना देणाऱ्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत देशोन्नतीचे सिन्नर येथील प्रतिनिधी राम सुरसे यांचा सन्मान करण्यात आला.
आशयाचे नियुक्तीपत्र खासदार शरद पवार, युुगेंद्र पवार यांचे हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले
तसेच त्यांची ‘नाशिक मोर्फा जिल्हाध्यक्ष’ म्हणुन निवड करण्यात आली. तशा आशयाचे नियुक्तीपत्र खासदार शरद पवार(Sharad Pawar), युुगेंद्र पवार यांचे हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. महा ऑरगॅनिक अँड रेसिड्यू (Organic and Residue)फ्री फार्मर्स असोसिएशन या सेंद्रिय तसेच अवशेष मुक्त शेतीला चालना देणाऱ्या संस्थेची पदाधिकाऱ्यांची वार्षिक मिटींग शनिवार दि.२२ रोजी कृषी महाविद्यालय (College of Agriculture) शिवाजीनगर पुणे येथील ‘डॉ शिरनामे’ सभागृह येथे पार पडली. कार्यक्रमात राज्यातील प्रगतशिल व राज्यशासनाचा पुरस्कार पुरस्कृत असे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीसह मोर्फाचे तज्ञ संचालक युगेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्षा कृषिभूषण स्वाती शिंगाडे, सचीव कृषीभूषण प्रल्हाद वरे आदी उपस्थित होते. श्री सुरसे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी येथील रहिवासी आहे. अतिशय कर्तव्यदक्ष व प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा विविध संस्थांकडून आजपर्यंत गौरव झाला आहे. पत्रकारितेत देखील ते कार्यरत आहेत. ‘देशोन्नती’चे (Deshonnati)सिन्नर तालुक्यातील प्रतिनिधी म्हणूनही ते काम बघतात. त्यांच्या या निवडीबद्दल खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.