आंदोलनाच्या माध्यमातून केला धिक्कार
हिंगोली (Sharad Pawar) : पुरोगामी विचारवंत ज्ञानेश्वर महाराज यांनी मंचावरून शरद पवार (Sharad Pawar) व खा.छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराज व श्री प्रभू श्रीरामचंद्र यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याने हिंगोलीत संत-महंतांसह विहिंप व बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी गुरूवारी निषेध आंदोलन केले.
महात्मा गांधी चौकात केलेल्या आंदोलनात बळीराम महाराज पुयणीकर, चैतन्य महाराज लोळेश्वर, अमोघ महाराज, विनायक महाराज, वेदमुर्ती लक्ष्मीकांत पाठक महाराज यांच्यासह माजी आमदार गजाननराव घुगे, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे, शिवाजीराव मुटकुळे, संजय ढोके, शाम खंडेलवाल, संतोष टेकाळे, माणिक लोडे, विजय ढोखळे, सूर्यभान ढेंगळे, कांतराव कोटकर, कृष्णा ढोके, कैलास शहाणे, सखाराम इंगळे, ज्योती वाघमारे, आशिष शर्मा, राजू यादव, होकर्णे आदी सहभागी होती.