लग्न सोहळा आटोपून कर्तव्यावर जात असतांना काराची झडप
तुमसर-तिरोडा मार्गावरील अपघातात मृत्यू
गावात शोककळा
तुमसर-तिरोडा मार्गावरील अपघातात मृत्यू
गावात शोककळा
आंधळगाव/तुमसर (Sharda Accidental Death) : चुलत बहिणीच्या हातावरील मेहंदी वाळली नसतांना ज्या कुटूंबात सनई चौघळाचे सूर निनादले त्याच कुटूंबात दुसर्या दिवशी वातावरण सुन्न होऊन शारदा पुंडे नामक तरुणीची अंत्ययात्रा निघाली. शारदा हिची भेट पुंडे कुटूंबियाला अखेरची ठरली. मन्न सुन्न करणारी घटना मोहाडी तालुक्यातील नवेगाव (धुसाळा) येथे दि.२१ मे रोजी घडली. चुलत बहिणीचा लग्न सोहळा आटोपून तिरोडा येथे कर्तव्यावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला काळाने झडप घालून ट्रकने चिरडले. त्यात शारदा दामोधर पुंडे (२६) हिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कुटूंबियांना होताच आनंदावर क्षणात विर्जन पडून शोककळा पसरली. मृतक ही मागील वर्षी तिरोडा येथे पाटबंधारे विभागात रुजू झाली होती, हे विशेष.
मोहाडी तालुक्यातील नवेगाव (धुसाळा) येथील शारदा पुंडे ही दहा महिन्याअगोदर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून तिरोडा येथे पाटबंधारे विभागात दहा महिन्याअगोदर नियुक्ती झाली होती. तीन दिवसाअगोदर तिच्या चुलत बहिणीचे नवेगाव येथे लग्न सोहळा असल्याने ती गावी आली होती. पुंडे कुटूंबात आनंदाचे वातावरण होते. दि.२० मे रोजी मोठ्या हर्षोल्हात लग्न सोहळा पार पडला. (Sharda Accidental Death) सायंकाळी चुलत बहिणीला सासरी पाठविण्यात आले. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना नियतीच्या मनात कोणता डाव होता, हे कळलेच नाही. आज दि.२१ मे रोजी सकाळी शारदा ही कर्तव्यावर जाण्यासाठी आपल्या दुचाकी क्र.एमएच ४९ बीजी ७६४५ या दुचाकीने गावाहून निघाली. मात्र तुमसर-तिरोडा मार्गावरील सरांडी येथे तिचेवर काळाने झडप घातली. विरुद्ध दिशेने येणार्या ट्रकने तिला चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातग्रस्त त्याच ट्रकने एका म्हशीला जबर धडक दिली. त्यात म्हशीचा सुद्धा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती कुटूंबियांना होताच शोककळा पसरली. कुटूंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. (Sharda Accidental Death) तिरोडा पोलिसांनी ट्रक व चालक यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. मृतक शारदा हिचे दोन्ही भाऊ नोकरीवर आहेत. एक भाऊ पोलीस उपनिरीक्षक तर दुसरा भाऊ सैन्यात आहे. तर एक बहिण पोलीस उपनिरीक्षक व दुसरी बहिण वनविभागात कार्यरत आहे. तर (Sharda Accidental Death) शारदा ही दहा महिन्याअगोदर स्पर्धा परिक्षेतून पाटबंधारे विभागात नियुक्ती होऊन तिरोडा येथे कार्यरत होती. तिच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून पानावलेल्या डोळ्यांनी तिला अखेरचा निरोप दिला.
सासरी गेलेली बहिण ओल्याच मेहंदीने परत येऊन दिला बहिणीच्या तिरडीला खांदा
मृतक शारदा हिच्या चुलत बहिणीचे दि.२० मे रोजी मोठ्या धुमधळाख्यात विवाह सोहळा पार पडला. विवाहोपरांत मोठ्या हर्षोल्हात बहिणीला सासरी जाण्यास निरोप दिला. कुटूंबात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र नियतीच्या मनात काय दळले होते, हे कुणास कळलेच नाही. नियतीने डाव साधत कर्तव्यावर रुजू होण्यास जात असलेल्या (Sharda Accidental Death) शारदा नामक तरुणीवर काळाने झडप घातली. झालेल्या अपघातात शारदा या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दि.२१ मे रोजी काल पार पडलेल्या विवाह सोहळ्याची नवेगाव येथे पुंडे कुटुंबियांकडे मंडप वाळवणीचा कार्यक्रम होता.
मात्र त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता शारदा तिरोडा येथे आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यास जात असतांना अपघात घडला. अपघाताची माहिती कुटूंबियांना होताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. कुटूंबात स्मशान शांतता पसरली. सासरी गेलेली चुलत बहिण ओल्याच मेहंदीने परत येऊन बहिणीच्या तिरडीला खांदा दिला. अखेर शवविच्छेदनानंतर मृतक तरुणीच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी उपस्थितांचे डोळे पानावले होते.