भारताचे CDMO शेअर्स तोंडघशी पडले
Share Market : अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फार्मा स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या कंपन्यांना CDMO कंपन्या असेही म्हणतात. अमेरिकेतील बायोसेक्योर कायद्यात चिनी कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफ्टी 24650 च्या जवळ दिसत आहे. परंतु बँक निफ्टीमध्ये (Nifty) खालच्या स्तरावरून 300 अंकांची चांगली खरेदी झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये उत्कृष्ट कामगिरी दिसून येत आहे. स्मॉलकॅप निर्देशांक नवीन शिखराच्या अगदी जवळ दिसत आहे.
दरम्यान, आज CDMO शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. लॉरस लॅब, डिव्हिस लॅब आणि पिरामल फार्मा या समूहाचे समभाग घसरले आहेत. अमेरिकेतील (America) बायोसेक्योर कायद्याचे कठोर उपाय मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा थेट फायदा चिनी बायोटेक कंपन्यांना होणार आहे. अमेरिकेच्या बायोसेक्योर कायद्यात चिनी कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
फार्मा स्टॉक्समध्ये मोठी घसरण
अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील (India) कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फार्मा स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या कंपन्यांना CDMO कंपन्या असेही म्हणतात. अमेरिकेतील बायोसेक्योर कायद्यात चिनी कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूद या कायद्यातून काढून टाकण्यात आली आहे. चिनी बायोटेक कंपन्यांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. बायोसेक्योर बिल पास न होणे हे भारतीय CDMO साठी मोठे नकारात्मक आहे.
अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून, ‘बायोसेक्योर ॲक्ट’ (Biosecure Act) आणले आहे. या कायद्यात औषध उत्पादकांना 2032 पर्यंत धोकादायक जैवतंत्रज्ञान (Biotechnology) कंपन्यांकडून उपकरणे खरेदी करण्यापासून किंवा सेवांचा करार करण्यापासून रोखण्याची तरतूद आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे चिनी करार औषध उत्पादक आणि संशोधन संस्थांवरील अमेरिकेचे अवलंबित्व कमी करणे. मात्र आता या कायद्यातून चिनी (China) कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.