नाशिक (Shashikant Jadhav) : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नगरसेवक तथा उद्योजक शशिकांत जाधव (Shashikant Jadhav) यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या नाशिक कार्यालयात झालेल्या बैठकीत (BJP) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रवासी संघटन मंत्री मा. रत्नाकरजी यांनी शशिकांत जाधव यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी (BJP) भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, मा. प्रभारी अमित ठाकर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते तथा बुद्धिजीवी प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक अजित चव्हाण, नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यावेळी उपस्थित होते. अनेक वर्ष राजकीय, सामाजिक तसेच उद्योग क्षेत्रात दोन दशकाहुन अधिक काळ आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या शशिकांत जाधव (Shashikant Jadhav) यांचा राज्यामधल्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांशी निकटचा संबंध असल्याने पक्षातील मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.