शेगाव खोडके खून प्रकरण; पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन
हिंगोली (Shegaon Khodke murder case) : सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके खून प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत; परंतु पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने पोलिसांच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून सराफा व्यापार्याकडे गहान ठेवलेल्या सोन्याची साखळी विक्री केल्याचा प्रकार घडला. या (Shegaon Khodke murder case) प्रकरणात पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
शेगाव खोडके येथील शिवाजी खोडके यांचा त्यांचा सख्खा भाऊ हरीभाऊ खोडके व मित्र व पवन आखाडे यांनी संपूर्ण शेती आपल्याला मिळावी या उद्देशातून खून केल्याचा प्रकार १४ डिसेंबरला उघडकीस आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपासचक्र फिरवून हरीभाऊ खोडके व पवन आखाडे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दोघांना न्यायालयात हजर केले असता २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, ही (Shegaon Khodke murder case) घटना घडण्यापूर्वी आरोपी हरीभाऊने रिसोड येथील व्यापार्याकडे दोन तोळे सोन्याची साखळी गहान ठेवली होती. त्यातील काही पैसे उचलून त्याने पवन आखाडे याला खुनामध्ये मदत करण्यासाठी दिले होते. हा प्रकार पोलिसांच्या चौकशीत सांगितल्यानंतर गोरेगाव पोलिसाने आरोपी हरीभाऊ याचे संबंधित सराफा व्यापार्याशी १६ डिसेंबरला व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. त्यात हरीभाऊने सोन्याची साखळी मोडून उर्वरित पैसे देण्याचे सराफा व्यापार्याला सांगितले. त्यावरून सराफा व्यापार्याने सोन्याची साखळी मोडून उर्वरित रक्कम त्रयस्त व्यक्तीला दिली. या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडी असताना पोलिसांनी त्याचे सराफा व्यापार्याशी पैशासाठी व्हिडीओ कॉलवर बोलने करून दिले.
या (Shegaon Khodke murder case) प्रकरणात १८ डिसेंबरला नारायण खोडके यांच्यासह इतर ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, शिवाजी खोडकेची संपूर्ण शेती मिळावी या उद्देशाने त्याचा मोठा भाऊ हरीभाऊ खोडके व पवन आखाडे यांनी कटकारस्थान रचून शिवाजीचा खून केल्याचे निवेदनात नमूद केले. या दोन्ही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी असताना त्याला पोलिसांनी मोबाईल पुरविणे व त्या मोबाईलवरून सराफ्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारे त्रयस्त व्यक्तीद्वारे संभाषण करून दिले.
तसेच सोन साखळीतील उर्वरित रक्कम सराफा व्यापार्याकडून घेऊन गोरेगाव पोलीस अधिकार्यांनी रकमेचे गभन केल्याचा आरोप केला. खुनासारख्या गंभीर प्रकरणाचा तपास दिलेल्या अशा भ्रष्ट पोलीस तपासी अधिकार्यावर विश्वास नसल्याचे निवेदनात नमूद केले. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि मयत शिवाजीच्या खुनाचा तपास हा स्वच्छ पारदर्शकरित्या करण्याकरीता तपासी अधिकार्याची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे निवेदनासोबत नारायण खोडके (Shegaon Khodke murder case) यांनी संबंधित सराफा दुकानातील सोनसाखळी मोडीच्या व्यवहाराचा व त्रयस्तानी घेतलेल्या पैशाचा व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे या खून प्रकरणानंतर पोलिसांवर केलेल्या आरोपामुळे घटनेचे गांभीर्य वाढले. त्यामुळे आता होणार्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोरेगाव पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचे मोबाईल व्हिडीओ कॉलद्वारे सराफा व्यापार्यासोबत बोलणे करून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
हिंगोली ग्रामीण डीवाएसपीकडे सोपविली प्रकरणाची चौकशी
खून प्रकरणात (Shegaon Khodke murder case) हरीभाऊ खोडके व त्याचा मित्र पवन आखाडे हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसाच्या मोबाईलद्वारे सराफा व्यापार्याचे त्रयस्तामार्फत बोलणे करून दिल्यानंतर सोन्याच्या साखळीतील रक्कम गोरेगाव पोलीस अधिकार्यांनी गभन केल्याचा आरोप नारायण खोडके यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
यात त्यांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काही व्हिडीओही सादर केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याची चौकशी हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्याकडे पोलीस अधिक्षकांनी सोपवून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यां मार्फत या खून प्रकरणाचा तपास करावा अशा सूचना दिल्याचे पोलीस अधिक्षक कोकाटे यांनी सांगितले.