देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shegaon: टक्कलग्रस्त भागातील नागरिकांच्या डोक्यावर केस परतले!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Shegaon: टक्कलग्रस्त भागातील नागरिकांच्या डोक्यावर केस परतले!
बुलडाणाविदर्भ

Shegaon: टक्कलग्रस्त भागातील नागरिकांच्या डोक्यावर केस परतले!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/21 at 7:11 PM
By Deshonnati Digital Published January 21, 2025
Share
Shegaon

शेगाव (Shegaon) : तालुक्यातील 11 गावांमध्ये झालेल्या केसगळती आजारग्रस्त नागरीकांच्या डोक्यावर केस पुन्हा परत येत असून सदरचा आजार हा कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदरचा आजार हा संसर्गजन्य (Infectious) नाही हे सिध्द झाले आहे. त्यामुळे सदरच्या रुग्ण संख्येत वाढ होत नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले असल्याचे दिसत आहे.

सारांश
निरीक्षण व नमुने संकलनतालुक्यातील नागरीकांचे सर्व व्यवहार सुरळीत- सरपंच रामा थारकर पाटीलआजार संसर्गजन्य नाही; परिस्थिती नियंत्रणात!गावनिहांय आकडेवारी

20 जानेवारी पर्यंत रुग्णांची (Patient) संख्या ही 204 वर गेली असून शेवटी माटरगांवात 3 रुग्ण निघाल्याची माहिती मिळाली आहे. केस गळतीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बाधित व्यक्तींच्या (Affected Person) डोक्यावर आता केस परत उगवत असल्याचे निरीक्षण आयुष मंत्रालयाच्या तज्ञ पथकाने नोंदवले आहे. विशेष म्हणजे डोक्यावरील केस गळत (Hair Loss) असले तरी बाधित पुरुषांच्या चेहरा आणि छातीवरील केस अबाधित असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. मिलींद सुर्यवंशी यांनी दिली.

तज्ञांच्या निरीक्षणानुसार बाधितांमध्ये फंगल (बुरशी) वाढ दिसून आली असून डोक्यावर खाज येण्याची समस्याही समोर आली आहे. तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी तज्ञांचे पथक (Homeopathy Expert Team) परतले आहे. होमिओपॅथी तज्ञ डॉ. सौदागर व जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या (J. J. Hospital Mumbai) होमिओपॅथी आणी युनानी पथकाने पहूरजीरा गावात तपासण्या केल्या. तसेच निरीक्षणे केली. कोणते संशोधन हाती घेतले आणि कोणते उपचार दिले याबाबत माहिती दिली. आयसीएमआर व विविध आरोग्य विभागातील चमुंनी रक्तांचे, पाण्याचे, मासाच्या तुकड्यांचे रिपोर्ट पुणे, नागपूर, अकोला येथे तपासणी करीता पाठविले असून येत्या 2-4 दिवसांत रिपोर्ट आल्यानंतर रोगांवर 100 टक्के नियंत्रण मिळणार आहे.

निरीक्षण व नमुने संकलन

पथकाने 5 प्रमुख गावांतील 42 बाधित व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या दिनचर्या, आहार तसेच अन्नधान्याचा स्त्रोत यासंबंधी नोंदी घेतल्या. काही नमुनेही तपासणीसाठी संकलीत करण्यात आले आहेत. बाधितांना एका महिण्याचे औषध (Medicine) देण्यात आले आहे.

पुढील महिन्यात पथक पुन्हा भेट देणार आहे. पथकाने तपासणी (Inspection) केली असता परत उगवणाऱ्या केसांमध्ये स्थैर्य असल्याचे आढळून आले. ओढल्यानंतर हे केस गळुन पडले नाहीत. परंतु नव्याने केस उगवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतही नमुने घेण्यात आले आहे.

तालुक्यातील नागरीकांचे सर्व व्यवहार सुरळीत- सरपंच रामा थारकर पाटील

बाधित 11 गावातील नागरीकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून सलून पासुन ते किराणा माल आणि जिवनाश्यक वस्तू पूर्ववत विकल्या जात आहे. मध्यंतरी तालुक्यात नागरीकांना बाधित ह्या हेतुने दूर केल्या जात होते, अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र त्या सर्व अफवा असून केस पुन्हा उगवत असल्यामुळे आणि आजारावर नियत्रंण आल्यामुळे जनजीवन पूर्ववत होत असल्याची प्रतिक्रिया बोडगांव सरपंच रामा थारकर पाटील यांनी दिली आहे.

आजार संसर्गजन्य नाही; परिस्थिती नियंत्रणात!

होमीओपॅथी, युनानी पथकाचे योगदान

होमिओपॅथी आणि युनानीच्या राज्यस्तरीय पथकानेही बाधित गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण (Survey) केले. त्यांनी बाधित व्यक्तींच्या आरोग्यविषयक संपूर्ण माहितीची नोंद घेतली व आवश्यक नमुने संकलित केले. केंद्रीय अनुसंधान परिषद, आयुष मंत्रालयातंर्गत (Ministry of AYUSH) होमिओपॅथी क्षेत्रीय संस्थेच्या तेजस्विनी पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही या तपासणीत सहभाग घेतला.

गावनिहांय आकडेवारी

3 प्राथमीक आरोग्य केंद्र (Primary Health Center) भोनगांव, जवळा बु., जलंब त्या अंतर्गत येणारी 11 गांवे भोनगांव अंतर्गत बोंडगांव-24, कालवड-24, कठोरा-30, भोनगांव-10, मच्छिन्द्रखेड-13 तर जवळा बु. अंतर्गत हिंगणा-5, घुई-11, तरोडा कस्बा-13 तर जलंब अंतर्गत येणारी गांवे पहुरजिरा- 37, माटरगांव बु-27, निंबी-10 असे एकुण 204 लाभार्थी संख्या झाली आहे.

You Might Also Like

Buldana Aagar: बुलडाणा आगारात 5 नव्या लालपरींचे आगमन!

Anganwadi: कामपूर्ण होण्याआधीच अंगणवाडी सुरु!

Bajrang Dal: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंना बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले!

Tree Stump: रिसोड येथे ‘एक पेड़ माँ के नाम’ संदर्भात वृक्षदिंडीचे आयोजन!

Risode Police: रिसोड पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांनी दाखविला माणुसकीचा धर्म!

TAGGED: Affected person, Greek state-level team, Hair loss, Homeopathy expert team, Infectious, Inspection, J. J. Hospital Mumbai, medicine, Ministry of AYUSH, patient, Primary Health center, Shegaon, survey
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Independence Day
मराठवाडामहाराष्ट्रहिंगोली

Independence Day: महिला सरपंच जया मानमोठे यांना स्वातंत्र्यदिनी दिल्लीचे आमंत्रण

Deshonnati Digital Deshonnati Digital August 11, 2024
Nashik Girl Abused: बदलापुरनंतर महाराष्ट्र पुन्हा हादरला; नाशकात मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार
Parbhani Crime: परभणीत दोन भामट्यांनी केली वृद्धाची फसवणूक
Buldhana: ..आणि म्हणुनच श्वेताताई बनल्या सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत…।
Farmer suicide Case: औसा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Buldana Aagar
बुलडाणाविदर्भ

Buldana Aagar: बुलडाणा आगारात 5 नव्या लालपरींचे आगमन!

July 12, 2025
Anganwadi
गडचिरोलीविदर्भ

Anganwadi: कामपूर्ण होण्याआधीच अंगणवाडी सुरु!

July 12, 2025
Bajrang Dal
विदर्भवाशिम

Bajrang Dal: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंना बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले!

July 12, 2025
Tree Stump
विदर्भवाशिम

Tree Stump: रिसोड येथे ‘एक पेड़ माँ के नाम’ संदर्भात वृक्षदिंडीचे आयोजन!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?