गंगाखेड(Parbhani):- पतीसोबत पटत नसल्यामुळे न्यायालयात फारकत व शेतीचा वाद सुरू असताना सासूच्या नावावर असलेली शेती परस्पर विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वडगाव स्टे. येथील ग्राम पंचायत सदस्य व विवाहितेचा वाद झाल्याने याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल (crime filed)झाले आहे.
शेतीचा वाद मिटविण्यावरून पतीपासून विभक्त विवाहिता व ग्रा.पं. सदस्यात वाद
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव स्टेशन ता. सोनपेठ येथील २७ वर्षीय विवाहितेचा विवाह गावातीलच व्यक्तीसोबत झाला होता. परंतु पतीसोबत पटत नसल्यामुळे दोघे ही विभक्त राहत असून न्यायालयात(court of law) फारकतीचा खटला सुरू आहे. असे असताना सुद्धा गावातील एका ग्राम पंचायत सदस्याने मध्यस्थी करून विवाहितेच्या सासूच्या नावावर असलेली शेती विक्री करण्यास लावली. याच शेतीचे प्रकरण मिटवून देतो म्हणून दि. १८ जुलै गुरुवार रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ग्राम पंचायत सदस्याने विवाहितेला घरी बोलावले.
रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल
तेंव्हा त्याच्या घरी गावातील अन्य एक जण उपस्थित होता. माझ्या सासूच्या नावावर असलेली शेती मध्यस्थी करून का विकण्यास लावली असे विवाहितेने ग्राम पंचायत सदस्यास विचारले असता तुला काय करायचे जमीन का तुझ्या नावाने आहे का असे त्याने म्हटल्याने आमचे कोर्ट मॅटर (court matter) चालू आहे हे माहीत असताना सुद्धा मध्यस्थी का केली? असे म्हणताच त्याने विवाहितेला अर्वाच्च व अश्लील भाषेत (obscene language) बोलत वाईट नजरेने पाहत ब्लाऊजला धरून वाईट हेतूने छातीला हात लाऊन धक्के मारत घराबाहेर हाकलून दिल्याची फिर्याद विवाहितेने दिल्यावरून दि. २० जुलै शनिवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या (disobedience) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात विवाहिता व तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
तर याच प्रकरणात दि. १८ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घरी आलेल्या विवाहितेने माझ्या नवऱ्याची जामीन तू का घेतली तुझ्यामुळेच तो बाहेर आला असे जोरजोराने म्हणून गोंधळ घालत तुला बघून घेते पोलीस स्टेशनमध्ये अटक करायला लावते असे म्हणत टेबलवर ठेवलेले ९० हजार रुपयांचे बंडल उचलून घेऊन जाऊ लागली तेंव्हा फिर्यादीच्या मुलाने तिच्या मागे जाऊन पैसे का नेतेस? असे विचारले, तेंव्हा विवाहितेने फिर्यादी व त्याच्या मुलासोबत झटापट करून पैसे गेटबाहेर रस्त्यावर उभ्या त्याच्या भावाकडे दिले व दोघेही तिथून निघून गेल्याची फिर्याद वडगाव स्टेशन ग्राम पंचायतचे सदस्य असलेल्या व्यक्तीच्या आईने दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात विवाहिता व तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २० जुलै रोजीच्या रात्री उशिराने व दि. २१ जुलै रोजी परसपरविरोधी दाखल या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे, पो. ना. एकनाथ अळसे हे करीत आहेत.