परभणी/ताडकळस(Parbhani):- येथुन जवळच असलेल्या निळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतातील आखाड्यावर काम करीत असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवार २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास निळा शिवारात घडली.
विजेचा शॉक बसल्याने शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू
या बाबत अधिक माहिती अशी की ताडकळस येथुन जवळच असलेल्या निळा येथील दिलीप उमराव सुर्यवंशी वय ३२ वर्षे हे शेतातील आखाड्यावर रविवार २१ जुलै रोजी रात्री राहिले होते. सोमवार २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आखाड्यावर काम करीत होते. काम करीत असतांनाच त्यांना विजेचा शॉक बसल्याने ते जागेवर खाली पडले. काही वेळातच आजुबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी पाहुन तात्काळ गावाकडे फोनद्वारे माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच गावातुन तात्काळ घटनास्थळी वाहन घेऊन ग्रामस्थांनी ताडकळस येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आले. परंतु ताडकळस ते निळा हा रस्ता खुपच खराब झाल्याने रस्त्यावर दोन वाहने बंद पडली.
ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून परभणी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) दाखल केले.परंतु या ठिकाणी डाँक्टरांनी तपासणी करून मृत(Dead) घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या आकस्मिक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.