रिसोड (Karanja Assembly Constituency) : महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक तथा ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब काशिराव देशमुख यांनी (Assembly Constituency) कारंजा विधानसभा निवडणुकीसाठी माहाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या कडून उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. आत्ताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले, नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख (MP Sanjay Deshmukh) यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने (Assembly Constituency) कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या पदाधीकारी कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून उमेदवारी मिळाल्यास विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रसंगी कारंजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब देशमुख यांनी कारंजा नगर परिषद मध्ये बांधकाम अभियंता म्हणून पाच वर्ष सेवा केली आहे. एका वर्षापूर्वीच सुधाकर देशमुख यांनी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत कारंजा विधानसभा परिसरात जनसंपर्क वाढवला आहे. (Karanja Assembly Constituency) कारंजा नगरपरिषद मध्ये कार्यरत असताना जनतेची अनेक विकासात्मक कामे त्यांनी केली आहे. उच्च शिक्षण असलेले बाळासाहेब देशमुख यांचा प्रशासकीय सेवेत असलेला अनुभव व लोकाभिमुख विकासात्मक कामावर भर देणार आहेत. महाविकास आघाडी कडून कारंजा विधानसभा ची निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. (Assembly Constituency) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कारंजा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे.