तरुणांसाठी आता ‘लाडका भाऊ योजना’
मुंबई (Ladka Bhau Yojana) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली आहे. ही योजना जाहीर होताच लाडक्या भावाबद्दल काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला जात होता. यानिमित्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पंढरपूरमध्ये बोलताना राज्यातील तरुणंसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली. “माझी लाडकी बहीण योजने”नंतर (Ladki Bahin Yojana) आता पुरुषांसाठी “लाडका भाऊ योजना” सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यामागे महाराष्ट्रातील महायुती सरकारचा उद्देश राज्यातील पुरुषांना आधार देणे हा आहे.
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले की, लाडक्या भावांकडेही आमचे लक्ष आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या “लाडका भाऊ योजना” (Ladka Bhau Yojana) मध्ये 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील. या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“लाडका भाऊ योजना” म्हणजे काय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या योजनेची घोषणा केली. या (Ladka Bhau Yojana) लाडका भाऊ योजनेअंतर्गत राज्यातील तरुणांना आर्थिक फायदा होणार आहे. म्हणजे दर महिन्याला सरकार तरुणांच्या खात्यात ठराविक रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे.
लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला?
12 वी उत्तीर्ण – दरमहा 6 हजार रुपये
डिप्लोमा झालेला तरुण – दरमहा 10 हजार रुपये
पदवीधर तरुण – दरमहा 10 हजार रुपये
ही “लाडका भाऊ योजना” कशी सुरू झाली?
महाराष्ट्र सरकारने जून महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर केली होती. तेव्हा महाराष्ट्रातील शिंदे सरकार (CM Eknath Shinde) पुरुषांशी भेदभाव केल्याप्रकरणी विरोधकांच्या निशाण्यावर आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक महाराष्ट्र सरकारला सातत्याने कोंडीत पकडत आहेत. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘लाडका भाऊ योजना’ (Ladka Bhau Yojana) सुरू करून, विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘लाडका भाऊ योजने’साठी पात्रता काय?
– या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
– या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
– शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत.
– शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल.
– अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
– इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी.