शिरड शहापूर (Shirad Shahapur Market ) : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शाहापुर मार्केट दिवसभर बंद ठेवण्यात आले होते .बिड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी सखल मराठा समाज बांधवांच्या वतीने दि.६ रोज गुरुवार या दिवशी मुख्य बाजारपेठ बंद ठेवून निषेध केला.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लवकरात लवकर आरोपींना शिक्षा द्यावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे आदी मागण्या साठी बंद पुकारण्यात आला होता. मस्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी दोन महिन्यापासून ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सखल मराठा समाज बांधवांच्या वतीने न्याय मिळवण्यासाठी निषेध म्हणून (Shirad Shahapur Market) बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी सुद्धा आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला.लवकर न्याय मिळावा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे