शिवजन्मोत्सवाच्या मुख्य सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांचा गौरव होणार
हिंगोली (Shiv Chhatrapati Gaurav Award) : सार्वजनिक शिवछत्रपती जयंती समिती तर्फे दिले जाणारे (Shiv Chhatrapati Gaurav Award) शिवछत्रपती गौरव पुरस्कार १७ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवजन्मोत्सवाच्या (Shiv Janmatsavam) दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत पाच पुरस्कार विजेत्यांना सन्मानीत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड श्री. उल्हास पाटील यांनी दिली आहे.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात शिवजन्मोत्सव (Shiv Janmatsavam) तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी सार्वजनिक (Shiv Chhatrapati Gaurav Award) शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यावेळी सचिव सागर डांगे, कोषाध्यक्ष शुभम बहिरे, कार्याध्यक्ष बिरजू यादव, समिती पदाधिकारी प्रकाश ईगोले, बालाजी वानखेडे, सुधाकर वाढवे, शिवाजी मेटकर, ज्ञानेश्वर चव्हाण, समिती मार्गदर्शक कल्याण देशमुख, छत्रपती शिवराय पुतळा समितीचे सचिव त्र्यंबक लोंढे, बाळासाहेब बोंगाणे, गजानन सोळंके यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत शिवछत्रपती गौरव पुरस्कारांची घोषणा समिती प्रमुख साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांनी केली. यावेळी पुरस्कार निवड समितीचे प्राचार्य पवन सोळंके -वसेकर ,पत्रकार राजेश दारव्हेकर यांनी पाच पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे जाहीर केली. कृषी क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार सोपानराव रामराव शिंदे -पांगरा शिंदे. यांना जाहीर करण्यात आला.
बारावीपर्यंत शिक्षण, अल्पभूधारक, फळबाग कुकूटपालन शेळीपालन असे शेतीपूरक व्यवसाय हे करतात. अल्पभूधारक असल्याने रेशीम शेती हा व्यवसाय त्यांनी निवडला व त्यात विशेष प्रगती करून भरघोस उत्पन्न घेतले. रेशीम शेतीमध्ये विशेष प्राविण्य मिळवून १५० पेक्षा जास्त प्रशिक्षण त्यांनी आतापर्यंत दिले. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे ही त्यांची आवड. नगदी पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी त्यांनी रेशीम शेती सर्व दूर पोहोचवली. शेतकऱ्यांच्या सामुहिक सहली आयोजित करणे, समूह शेतीला चालना देणे, प्रत्यक्ष शेतात जाऊन बांधावर माहिती देणे, वर्तमानपत्र व मासिकातून त्यांचे लेखही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबरोबर आजपर्यंत बारा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
साहित्य क्षेत्रातला मानाचा पुरस्कार गणेश प्रल्हादराव आघाव यांना जाहीर करण्यात आला. त्यांचे दोन कवितासंग्रह एक बालकविता संग्रह एक कथासंग्रह प्रसिद्ध आहे. पोरी शाळेत निघाल्या की ही कविता ३२ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतरित झाली. सर्व प्रमुख भारतीय भाषण मध्ये ही कविता उनुवादित झाली. मातीच्या कविता हा उर्दूमध्ये अनुवाद. बालभारती पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर सदस्य. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. पोरी शाळेत निघाल्या ही कविता जपानी भाषेत अनुवादित झाली असून तिथे जपानच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार देविदास दत्तात्रय गुंजकर यांना जाहीर करण्यात आला. ते प्राथमिक शिक्षक आहेत. कोरोना काळात शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम विशेष उल्लेखनीय होय. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात जिल्ह्यात पहिली शंभर टक्के प्रगत शाळा म्हणून जीव तरोडा. ६०० च्या वर शिक्षकांना कार्यशाळांना मार्गदर्शन. जिल्ह्या बाहेरही कार्यशाळा घेतल्या. त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्ययन प्रक्रियेचे घटक निर्मिती व भविष्य. शिक्षण तथा अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन यांवर त्यांचे कार्य आहे.
लोककला या प्रकारात कुमारी वैष्णवी शामराव धोंगडे मानाचा पुरस्कार जाहीर झाला. इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी ही मुलगी असून संबळ हे वाद्य अतिशय उत्कृष्ट वाजवतो. लोककला माध्यमातून पारंपारिक गोंधळ या प्रकारात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचे प्रतिनिधित्व तिने केले. त्रिपुरा आगरताळा येथे अखिल भारतीय लोककला महोत्सवातून पर राज्यात गोंधळ प्रकारातील संबळ वादन करून महाराष्ट्राची परंपरा प्रदर्शित केली. दिल्ली व उज्जैन येथे गोंधळाचे सादरीकरण केले. एबीपी माझा स्टुडिओमध्ये तिने संबळ वाद्य वाजवले.
समाजसेवा या क्षेत्रासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार शिरीष गुंडेवार हिंगोली यांना जाहीर झाला. गॅलेक्सी सेवाभावी संस्थेची स्थापना त्यांनी केली व त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून आजपर्यंत पाच हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले. रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे रक्त रक्तदानासाठी जनतेला आवाहन करणे अशी कामे त्यांनी केली. रक्तदान संकलित करून रक्तदानाची उणीव त्यांनी भरून काढली. वेळोवेळी गरजू लोकांना मदत करतात. ते किराणा दुकानदार चालक असून वेळात वेळ काढून समाजकार्य करतात. रक्तदानाबरोबरच अवयव दान यासाठी सुद्धा त्यांनी (Shiv Chhatrapati Gaurav Award) विशेष काम केले. अवयव दाना मधील नेत्रदान याची जनजागृती करून मित्र दिनासाठी लोकांना परावर्तित केले. आजपर्यंत २५ नेत्रदान त्यांनी यशस्वीरित्या लोकांना परावर्तित करून करून घेतले.
या पाचही पुरस्कार विजेत्यांना (Shiv Janmatsavam) शिवजन्मोत्सवाच्या मुख्य सोहळ्यात मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष अॅड श्री. उल्हास पाटील यांनी दिली आहे.