सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा निर्णय; बुधवारी बैठक संपन्न
हिंगोली (Shiv Jayanti celebrations) : शिवजन्मोत्सव २०२६ जय्यत साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या अनुषंगाने शिवजन्मोत्सव २०२६ ची धुरा जिजाऊंच्या लेकींच्या हाती महिलांकडे देण्याचा महत्वपुर्ण निर्णय महोत्सव समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. येत्या बुधवारी महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली व छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृहात शनिवार १७ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षतेखाली समितीचे अध्यक्ष ऍड.उल्हास पाटील यांची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक मार्गदर्शन समितीचे सदस्य कल्याण देशमुख यांनी केले. यावेळी मागील वर्षाचा हिशोब शिवजन्मोत्सव २०२५ चे अध्यक्ष व सचिवांनी सादर केला. यानंतर शिवजन्मोत्सव २०२६ नियोजन विषयक बाबी बैठकीत सचिव सोनु डांगे, पुतळा समितीचे सचिव त्र्यंबकराव लोंढे पाटील, डॉ.नामदेव कोरडे, प्रकाश इंगोले यांनी बैठकीत मांडल्या. यावेळी जय्यत स्वरुपात यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे ठरले. महिलांची बैठक घेऊन कार्यकारिणी गठीत करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. या अनुषंगाने बुधवार दि.२१ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात महिला, पुरुष व शिवप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संपुर्ण नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीनंतर हस्यसम्राट स्व.मिर्झा बेग यांच्या दुखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीला समितीचे सल्लागार विनायक भिसे, सुनिल पाटील गोरेगावकर, मनोज आखरे, शिवाजी ढोकर पाटील यांच्यासह गजानन मगर, डॉ.प्रल्हाद शिंदे, कृष्णा पवार, मिलिंद उबाळे, नामदेव कापसे, आरीफ पठाण, प्रितम सरकटे, शिवाजी मेटकर, सुधाकर वाढवे, गोपाल भोस, डॉ.नामदेव कोरडे, प्रकाश इंगोले, बालाजी पाठक, विजय गुंडेकर, नरसिंह जाधव, प्रा.महेश राखोंडे, बाबाराव श्रृंगारे, माजी सैनिक सय्यद मिर, राजेंद्र हलवाई, खंडेराव सरनाईक, बालाजी वानखेडे, माधव सपाटे, गजानन जाधव, निरज देशमुख, गोपाल सरनाईक, अमोल देशमुख, गजानन भालेराव यांच्यासह शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.




