निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन शुक्रवार १४ फेब्रुवारीला!
बुलढाणा (Shiv Jayanti) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व मराठी मनाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा (Shiv Jayanti) जयंती सोहळा, बुलढाणा येत्या शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी आपल्या विनोदी शैलीने प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivritti Maharaj Indurikar) यांच्या जाहीर शिवकीर्तनाने आरंभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती (Shiv Jayanti) उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने बुलढाणा शहरात प्रथमच महाराष्ट्रातील गाजलेले विनोदी कीर्तनकार हभप.निवृत्ती महाराज इंदोरीकर (Nivritti Maharaj Indurikar) यांचे जाहीर शिवकीर्तन शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत “शिवनेरी” जिजामाता प्रेक्षागार परिसर, आयडीबीआय बँक चौक बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी या शिवकीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, हे विनम्र शिवआवाहन “आम्ही शिवप्रेमी” समस्त बुलढाणेकर व आयोजक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती (Shiv Jayanti) उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.