हिंगोली (Nagesh Patil Ashtikar) : शनिवारी हिंगोलीत झालेल्या शिवसेनेच्या चिंतन बैठकीत खा. नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांचे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा शिवसैनिकांनी उपनेते व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्याकडे माडली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर हिंगोलीत शिवसेना उबाठाचे आढावा बैठक शनिवारी 11 जानेवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकार्यासहीत अनेक शिवसैनिकांनी बबनराव थोरात यांच्याकडे व्यथा मांडली. जिल्ह्यात शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीत एकटे (Nagesh Patil Ashtikar) नागेश पाटील आष्टीकर हेच लोकप्रतिनिधी असून त्यांचा संपर्क कमी झाल्याचे शिवसैनिकांनी संपर्क प्रमुखांकडे सांगितले. संवाद बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीबाबत व पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
या बैठकीत माजी आमदार डॉ. संतोष टारफे,शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील, सहसंपर्कप्रमुख विनायकराव भिसे,वसमत विधानसभा सहसंपर्कप्रमुख सुनिल काळे,शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख, उपजिल्हाप्रमुख जि.डी. मुळे,डी.के.दुर्गे, गणेश शिंदे,अनिल कदम, प्रशासकीय उपजिल्हाप्रमुख उध्दवराव गायकवाड, सभापती भैय्या पाटील गोरेगावकर,जिल्हा प्रवक्ता विठ्ठलराव चौतमाल, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण,दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे, उपजिल्हा संघटक सोपान पाटील, शंकरराव घुगे,तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, गणेश देशमुख,माऊली झट्टे, तालुकासंघटक बाळासाहेब गावंडे,अनिल शिंदे,पंढरीनाथ ढाले, सभापती मारोतराव खांडेकर, माजी जि.प.सदस्य नागोराव करंडे,मंगलाताई कांबळे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख अलीम खतीब,अमोल काळे,अमोल पाईकराव,डॉ.चंद्रमुनी पाईकराव, कळमनुरी शहरप्रमुख संतोष सारडा, औंढा शहरप्रमुख बिंदूमाधव कुलकर्णी, चंद्रशेखर उबाळे,विष्णु जाधव,सुनिल खंडागळे, दत्तराव लोंढे,भीमराव कऱ्हाळे,प्रभाकर गवारे,भल्ला कोकाटे, प्रदीप मस्के,बाळु ससे, माजी नगरसेवक राजु संगेकर, श्रावण चव्हाण, सर्कलप्रमुख बाबुराव सुकळकर,उत्तमराव उगले, गजानन अवचार, गणेश मुलगीर,विलास जवादे, बालाजी पोले, बालाजी जगताप,भारत राठोड,शिवाजी कऱ्हाळे, कैलास यादव,आकाश सुतारे इतर सर्व विभागाचे पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.