स्वीकृत सदस्य पदी भाजपचे कैलास शहाणे, शिवसेनेचे गुड्डू बांगर, नितीन बांगर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील यांची निवड
हिंगोली (Hingoli Municipality) : हिंगोली नगरपालिकेत पालिकेत शुक्रवारी उपाध्यक्ष स्विकृत सदस्य निवडीसाठी सर्व साधारण सभा घेण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे अब्दुल माबुद बागवान (Abdul Mabud Bagwan) तर स्विकृत सदस्य पदी शिवसेनेचे गुड्डु बांगर, नितिन बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील, भाजपचे वैâलास शहाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
१६ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य (Hingoli Municipality) निवडीकरीता नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्व साधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये शिवसेनेचे १६, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपाचे ५, काँग्रेसचे २ नगरसेवक उपस्थित होते. सभेमध्ये मुख्याधिकारी अरविंद मुढे यांची ही उपस्थिती होती. सभेमध्ये उपाध्यक्ष पदाकरीता शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक अब्दुल माबुद बागवान (Abdul Mabud Bagwan) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या सोबतच स्विकृत सदस्यांकरीता शिवसेनेतर्पेâ उमेश उर्फगुड्डु बांगर, नितिन बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील, भाजपचे कैलास शहाणे यांचे ही अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित उपाध्यक्षासह स्विकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये दिलीप चव्हाण, शोभा कळासरे, हमीद प्यारेवाले, राणी गायकवाड, अनिता गुठ्ठे, नाना उर्पेâ नर्सिंग नायक, वैशाली गोटे, जितसिंग शाहु, ज्योती बलखंडे, कय्युम पठाण, वसंताबाई लुुंगे, सय्यद अमिर अली, रितीका सराफा, आईशीया बेगम, डॉ. सुरभी चौधरी, कपील खंडेलवाल, इंदुबाई लव्हाळे, अ. माबुद बागवान, श्रीराम बांगर, सोनाली गोटरे, रविंद्र वाढे, सुनिता बांगर, ज्योती बांगर, मोहम्मद रुबीना वाजीद, शेख निहाल हाजी इस्माईल, अंजुम बेगम शेख मुजीब, हाशमी स.बासीत मौलाना, सुमित कांबळे, शशिकलाबाई बांगर, निधी गोरे, शाम कदम, साद कुरैशी अहेमद, पठाण नाजीया परवीन यांची उपस्थिती होती. सभे प्रसंगी अनेक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपाध्यक्ष, स्विकृत सदस्य निवडीनंतर बॅन्ड, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष
हिंगोली नगर पालिकेत (Hingoli Municipality) शिवसेनेचे बहुमत असून उपाध्यक्ष पदी अ. माबुद बागवान, स्विकृत सदस्यपदी शिवसेनेचे उमेश उर्पेâ गुड्डु बांगर, नितिन बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील व भाजपाचे कैलास शहाणे यांची बिनविरोध निवड जाहिर होताच त्यांच्या समर्थकांनी नगर पालिकेत मोठा जल्लोष केला. तसेच बॅन्ड, ढोल ताशाच्या गजरामध्ये या निवडीचा आनंद व्यक्त करण्यात आला.




