मुंबई (Balasaheb Thackeray) : हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते नामदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी आज गुरुवार 23 जानेवारी रोजी भेट देऊन पुष्पहार अर्पण करूत विनम्र अभिवादन केले.
यानंतर बाळासाहेब भवन पक्ष कार्यालय येथील वंदनीय (Balasaheb Thackeray) बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक चळवळ होते. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी सुरू केलेल्या (Shiv Sena) शिवसेना या चळवळीने सामान्य लोकांना आवाज दिला आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या नेतृत्वाने सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभारली, ज्याचा प्रभाव आजही कायम आहे.
त्यांची ज्वलंत वक्तृत्वशैली, कार्यक्षम नेतृत्व, दृढनिश्चय आणि महाराष्ट्रासाठीची निष्ठा लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या विचारांची शिकवण आणि योगदान आजही मार्गदर्शक ठरते.. अशा भावना ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी व्यक्त करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची स्मृती व त्यांचे विचार आणि कार्य यांना जयंतीनिमित्त त्यांना शतशः प्रणाम केला.