पुसद(Pusad):- जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena party chief)व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा वाढदिवस साजरा होत असून त्यानिमित्त पुसद येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे यांच्या पुढाकारात विविध सामाजिक उपक्रम राबवत शहरातील विविध अंगणवाड्यांमधील बालकांना टिफिनचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे यांच्या पुढाकारात शिवसेनेचा उपक्रम
बाल विश्व अंगणवाडी, नूर कॉलनी येथील गुलमोहर अंगणवाडी येथील बालकांना टिफिन व खाऊचे वाटप करण्यात आले तर आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील माणुसकीची भिंत येथे गोरगरीब व रुग्णांना जेवणाचे वाटप करण्यात येणार आहे. तर येथील शिवसेनेचे एड. वीरेंद्र राजे यांच्यामार्फत शहर व तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा व कोरोना(Corona) काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सत्कार(felicitation) करण्यात येणार आहे तर त्यांच्यामार्फत शिवसैनिकांना स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे,तालुका संघटक तथा माजी नगरसेवक मोहन विश्वकर्मा, तालुकाप्रमुख रवी पांडे, हरीश गुरुवाणी शहर प्रमुख, महिला आघाडीच्या मालती मिश्रा , विद्यांजली पोहरकर, अनिता बहादुरे, दिनेश गवळी, रवी बहादुरे, अविनाश बहादुरे राजगुरू जोशी, डॉ. पदमवार, राजीक देशमुख, विजय पानपट्टे, निखिल दशरथे व अरुण पुलाते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला शिवसैनिक उपस्थित होते. सदरील अंगणवाडीच्या सेविका उमा चव्हाण, अनुराधा विटाळकर, कविता बोरकुटे, मोरे व शारदा जामकर यांचे सहकार्य लाभले.