बुलडाणा (Shiv Sena) : मेहकर तालुक्यातून विविध आरोग्यविषयक व सामाजिक कामात आघाडीवर असलेले “दै. देशोन्नती”चे मेहकर तालुका प्रतिनिधी अमर राऊत (Amar Raut) यांची शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या (Medical Aid Room) अमरावती पश्चिम विदर्भ विस्तारकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्याची विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या निर्देशानुसार त्यांना या नियुक्तीचे पत्र मदत कक्षप्रमुख रामहरी राऊत व सहकक्षप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांना दिले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Shiv Sena) वैद्यकीय मदत कक्षाच्या (Medical Aid Room) पश्चिम विदर्भ विस्तारक म्हणून अमर राऊत यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमर राऊत (Amar Raut) यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत व सहकक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांना दिले आहे.