विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या पदाधिकार्यांना आढावा बैठकीत सुचना
परभणी (Shiv Sena MLA Ambadas Danave) : जनसामान्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संघटन मजबुत असणे आवश्यक आहे. त्यामुळे बुथ, गाव पातळीवर (Shiv Sena) शिवसेना (उबाठा) पक्षाच्या शाखांची बांधणी करण्याच्या सुचना जिल्ह्यातील पदाधिकार्यांना आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे (MLA Ambadas Danave) यांनी दिल्या.
शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जिल्ह्यातील (Shiv Sena) शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकार्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस नव्याने नियुक्त विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, शिवसेना उपनेते खा.संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, संजय साडेगावकर, सखूबाई लटपटे, मंगल कथले, दिपक बारहाते, अर्जून सामाले, सदाशिव देशमुख, संजय गाडगे, विष्णू मुरकुटे, दशरथ भोसले, श्रीरंग रोडगे, रविंद्र धर्मे, रणजीत गजमल, माणिक आव्हाड, नंदू अवचार, अनिल सातपुते, श्रीकांत कर्हाळे, काशिनाथ काळबांडे, पंढरीनाथ घुगे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना पुढे दानवे (MLA Ambadas Danave) म्हणाले की, संघटना असेल तरच आपण आहोत, अन्यथा आपणास कोणतीही किंमत राहत नाही. परभणी सातत्याने शिवसेनेचे शक्तीकेंद्र राहिले असून येथील जनता शिवसेना, उध्दव ठाकरे, बाळासाहेबांच्या विचारांच्या मागे उभी आहे. प्रत्येक पदाधिकार्याने दररोज एक तासभर पक्षाचे काम केले तर संघटन मजबुत होईल. प्रत्येकांनी शिवसेना पक्षाचे कोणतेही काम आव्हान म्हणून स्विकारावे. प्रत्येकाला मतदारयाद्यांचा अभ्यास असणे आवश्यक असून शिवसेनेला १०० टक्के जागा लढविण्याचा एक काळ येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न करावेत, अशा सुचना विरोधी पक्षनेते दानवे (MLA Ambadas Danave) यांनी दिल्या.
संघटना टिकली नाही तर कोणी विचारणार नाही- खा.जाधव
जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीत खा. संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिवसेना (उबाठा) पक्षाची संघटनाच टिकली नाही तर आपणास कोणीही विचारणार नाही. त्यामुळे प्रत्येकांनी संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करावेत. युवा आघाडी, महिला आघाडी यांनी त्यांच्या शाखांचे विस्तारीकरण करून ताकद वाढविण्यासाठी काम करावेत. पदाधिकार्यांनी काम करून स्वत:ला सिध्द करावेत. त्यांच्या पाठीमागे पक्ष म्हणून कायम उभे राहु, असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
भगवं वादळ निर्माण करायचय- आ.डॉ.पाटील
शिवसेनेच्या नेतृत्वात पून्हा एकदा भगवं वादळ निर्माण करायचय यासाठी शिवसैनिकांनी संघटीत होऊन एकजूटीने काम करावे. देशात मोदी-शाहांच्या विरोधात एकमेव उध्दव ठाकरे लढत असतात. त्यांना बळ देण्याचं काम आपणास करायचं आहे. असे आढावा बैठकीत आ. डॉ. राहुल पाटील (Dr. Rahul Patil) यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले.