सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला धरले धारेवर
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Shiv Sena at Chikhli Hospital) : चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहाच्या नातेवाईकाकडून 2000 ते 3000 रुपये मागितले जात असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सैय्यद यांना धारेवर धरून जाब विचारला आणि रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेण्यात येणारे पैसे घेणे बंद करा अन्यथा पुढील आंदोलन शिवसेना स्टाईलने करू असा इशारा उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर व पदाधिकारी यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला आहे.
उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
चिखली ग्रामीण रुग्णालयात चिखली शहरासह परिसरातील आणि मराठवाड्यातील बऱ्याच गावातील लोक रुग्णसेवा घेतात सोबतच परिसरात मरण पावलेल्या लोकांची शवविच्छेदन या ठिकाणी होतात महिन्याला किमान 25 ते 26 पी. एम . होतातच यासाठी शासन स्तरावरून रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून प्रति शवाविच्छेदनास पाचशे रुपये असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरच्या मदतीनिसाला म्हणजेच (स्विपरला) मिळतात असे असताना गत काही दिवसापासून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाडून शिल्लक चे पैसे घेण्याची प्रथा बऱ्याच दिवसापासून येते होती सुरुवातीला शंभर, दोनशे पासून ते पाचशे रुपयापर्यंत मूतकाचे नातेवाईक देत होते मात्र पीएम करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा वाढत गेल्या आणि अपेक्षे सोबतच मूर्त पावलेल्या लोकांच्या भावनेचा आणि त्या परिस्थितीचा विचार न करता आडवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले.
मृतदेह शिवविच्छेदन केंद्र टाकल्यानंतर कुलूप लावून परस्पर गायब होणे मोबाईल बंद करून टाकणे अति मद्य प्राशन करून घेणे , मगं त्याला शोधण्याकामी नातलगांची दमछक होणे आणि अशा वेळी नातलगांची शेकडो मित्रमंडळी, पाहुणे मंडळी या ठिकाणी जमलेली असताना त्यांच्या करून 2000 ते 3000 रुपयाची मागणी करण्याची सुरुवात झाली ज्या व्यक्तीच्या घरी दुःख झाले ती व्यक्ती दुःखात असताना अशा परिस्थितीला सामोरे जाण्याच्या मनस्थितीत नसते अशावेळी त्याच्या जवळच्या मंडळीला हे सर्व सोपस्कार करावे लागत असतात आणि याच परिस्थितीचा गैरफायदा घेतल्या जातो.
येथील वैद्यकीय अधिकारी, ड्युटीवरील डॉक्टर यांचे मृत पावलेल्या व्यक्तीचे पी. एम. करून देणे हे कर्तव्य आहे असे असताना या जबाबदारीतील सर्वजण निमूटपणे पी एम करण्यासाठी पैसे मागून अडवणूक केल्या जाते आहे हे पाहतात व परिस्थितीला ते सुद्धा जणू काही खतपाणी घालत असतात अशा वेळी पोलीस सुद्धा मूकपणे हे सगळं बघत असतात जी मंडळी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे ती मंडळी हा खर्च पेलावू शकतात मात्र परिस्थितीने गरीब असलेली मंडळी नातेवाईक यांच्यासाठी हे अवघड असते.
दिनांक 26 सप्टेंबर रोजी दोन जणांचे पीएम या ठिकाणी झाले परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांचे नातलग तीन हजार रुपये देण्यास असमर्थ होते अशावेळी त्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्याकडे धाव घेऊन ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या या कारभाराची माहिती दिली कपिल खेडेकर यांनी कालची परिस्थिती हँडल केली.
मात्र 27 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शिवसेना पदाधिकारी यांच्या सह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सैय्यद यांच्या केबिनला घेराव घातला आणि तासभर ठिय्या आंदोलन करून ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या या अडवणुकीचा पडदाफास केला आणि यापुढे कुठल्याही नागरिकाकडून शवविच्छेदनाचे पैसे मागितल्या जाता कामा नये असा दम चिखली ग्रामीण रुग्णाच्या प्रशासनाला दिला सात दिवसांमध्ये परिस्थिती सुधारावा अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करून असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, तालुका प्रमुख श्रीकिसन- धोडगे पाटील, शहर प्रमुख श्रीराम झोरे,युवा सेना जिल्हाप्रमुख नंदु कराडे, आनंद गैची, विलास सुरडकर, अरूण अंबसकर , समाधान जाधव, सुनिल रगड, शाम शिगणे, रवि पेटकर, बंडू जाधव, मनोहर शिंदे, गजानन कुटे, गजानन पवार ,अशोक सुरडकर, आशोक मोहित, देविदास लोखंडे शभुम गाडेकर, अनिल जावेर, पवन चिचोले, इम्रान पठाण, सादिक बाई, इफाभाई,व शिवसैनिक उपस्थित होते
ग्रामीण रुग्णालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे पदाधिकारी दाखल होताच चिखली पोलिसांनी या घटनेची तत्परतेने दखल घेत रुग्णालयाकडे धाव घेतली आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला पोलिसांनी व रुग्णालय प्रशासनाने व्हिडिओ शूटिंग घेण्यास सुरुवात केली. पोलीसांनी ठिय्या आंदोलन स्थळी तात्काळ पोहोचल्यामुळे प्रशासनाची बोलण्यातून होणारी शाब्दिक चकमक टळली आणि आक्रमक होणारे आंदोलन चर्चे व ईशाऱ्यावर संपले. असेच म्हणावे लागेल