जनसामान्यांचे काम करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम!
रिसोड (Shiv Sena Party) : भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) शेतकरी विरोधी भुमीकेला व भाजप मधील स्थानिक नेतृत्वाच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून रिसोड तालुक्यातील किसान आघाडीचे माजी तालुका उपाध्यक्ष गजानन लक्ष्मण बाजड याचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शेतकरी, शेत मजूर व सर्व सामान्य प्रती असलेली प्रचंड संवेदनशील विचारधारेने प्रेरित होऊन रिसोड विधान सभेचे (Risod Legislative Assembly) सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप व उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रिसोड येथील कार्यालयात उपस्थित राहून दि 30 जुलैला जाहीर पक्ष प्रवेश घेतला.
पदाधीकारी उपस्थित!
यावेळेस तालुका प्रमुख नारायण आरू, तालुका संघटक आनंद कुलाळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख गजानन सानप, केनवड सर्कल प्रमुख सुरेश बाजड, आदी पदाधीकारी उपस्थित होते. सदर प्रवेश घडविण्याबाबद रिसोड तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी महत्त्वाची भुमीका बजावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विचाराने जनसामान्यांचे काम करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम आगामी काळात करू असे गजानन बाजड यांनी प्रवेशावेळी भावना व्यक्त केल्या. असल्याची माहीती प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.




