बुलढाणा(Buldhana):- शेतकऱ्यांना बळीराजा म्हणताना त्यांच्या अडचणी राज्य सरकारला दिसत नाहीत. शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकार केवळ घोषणाबाजी करून इव्हेंट मॅनेज करत आहे. मोताळा व बुलडाणा तालुक्यातील 150 गावात मशाल जागर यात्रा संपन्न झाली. शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठीच सोमवार 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठीच आक्रोश मोर्चा- जालिंदर बुधवत
या आक्रोश मोर्चामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे, खासदार तथा संपर्कनेते अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेची (Shivsena)नेतेमंडळी आक्रोश मोर्चात सामील होणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये मायबाप शेतकऱ्यांनी सामील व्हावं असे आवाहन शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.