हिंगोली (Shiv Sena Ubhata group) : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे मतदार संघातील महिलांना पैसे वाटत असल्याची तक्रार (Shiv Sena Ubhata group) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.
जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, बालासाहेब मगर, डॉ. रमेश मस्के, अजित मगर, आनंदराव जगताप, उद्धवराव गायकवाड, सखाराम उबाळे व अन्य काही पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना याबाबत एक निवेदन दिले आहे. निवेदनात तक्रार करण्यात आली आहे की, आ.संतोष बांगर (Santosh Bangar) हे कळमनुरी मतदार संघात मोठ्या प्रमाणावर महिलांना पैसे वाटत आहेत.हे वाटप लाखोंच्या रकमेचे असून जिल्ह्यात चालविल्या जाणार्या अवैध धंद्यातून हा पैसा वाटप केला जात आहे. या माध्यमातून मतदारांना प्रलोभन देणे चालू आहे त्यामुळे अवैध पैशाचे वाटप बंद करावे व चौकशी करावी, अशी मागणी (Shiv Sena Ubhata group) शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
पायाखालची वाळू घसरत आहे- आ. बांगर
कळमनुरी विधानसभा मतदार संघात झालेली विकास कामे, मुख्यमंत्र्यांनी दिलेली लाडकी बहीण योजना व (Shiv Sena Ubhata group) शिवसेनेला मतदार संघात पोषक होत असलेले वातावरण बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, असा प्रतिहल्ला आ. संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी या तक्रारीवरून चढविला.