शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व खासदार नागेश दादा पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त
हिंगोली (Shiv Sena Uddhav Thackeray) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे (Uddhav Thackeray) व खासदार नागेश दादा पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे पाटील (Ganesh Shinde Patil) यांनी मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध मुलांचे विद्यालय व (Sevasadan hostel) सेवासदन मुलांच्या वस्तीगृहासाठी इन्व्हर्टरसाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत भेट दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे (Uddhav Thackeray) व हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे खासदार नागेश दादा पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी हिंगोली उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध मुलांचे विद्यालयात इन्व्हर्टरसाठी ११ हजार रुपये रोख रक्कम देऊन येथील विद्यार्थ्यांसाठी जेवणही दिले. तर (Sevasadan hostel) सेवासदन मुलांच्या वस्तीगृहासाठीही इन्व्हर्टरसाठी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत भेट दिली. तसेच सेवासदनच्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार नागेश दादा पाटील आष्टीकर यांचा वाढदिवस साजरा केला.
सेवासदनच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. गणेश शिंदे पाटील यांनी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील, उपजिल्हाप्रमुख प्राशसकीय उध्दवराव गायकवाड, शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, विठ्ठल चौतमल जिल्हा प्रवक्ता .युवासेना माजी विस्तारक दिलीप घुगे, उपजिल्हासंघटक शंकर घुगे, परमेश्वर मांडगे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, तालुकाप्रमुख आनंदराव जगताप, पुंजाजी मुळे, संदीप तनपुरे बबनराव गाडे, बालाजी गावंडे, गणेश गावंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.