बाळासाहेब देशमुख यांचे आवाहन
कारंजा (Shiv Sena Uddhav Thackeray) : आत्ताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन तसेच (Shiv Sena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला सकाळी 11:30 वाजता (Karanja Assembly Constituency) कारंजा येथील शेतकरी निवास मंगरूळ रोड कारंजा येथे पदाधीकारी कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
या मेळाव्यास (Karanja Assembly Constituency) करंजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेकांनी (Shiv Sena) मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब देशमुख (Balasaheb Deshmukh) यांनी केले आहे. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून वाशिम यवतमाळ लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितामध्ये सह संपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजानन देशमुख, विधानसभा संपर्कप्रमुख भोला राठोड, सह संपर्कप्रमुख अनिल राठोड, सहसंघटक डॉ. सुधीर विल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक, विधानसभा प्रमुख गोपाल येवतकर, विधानसभा समन्वय गणेश ठाकरे, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अमोल मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड, विधानसभा संघटिका मालाताई चव्हाण, युती सेना प्रिया महाजन मंचावर उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन (Shiv Sena) शिवसेना ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख (Balasaheb Deshmukh) यांच्यासह तालुकाप्रमुख विलासराव सुरळकर, रविभाऊ पवार, गणेश बाबरे,संतोष पुरी, शंभुराजे जिचकार, अतुल दरेकार, जुबेर मोहनावाले, शिवा अंधारे, अविनाश दहातोंडे, श्याम पावडे व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, वाहतूक सेना, कामगार सेना यांच्यासह (Karanja Assembly Constituency) कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.