शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुखांचा दावा
लातूर (Latur Rural Assembly) : लातूर ग्रामीणची विधानसभा ही परंपरागत शिवसेनेचीच असून या जागेवर शिवसेनाच लढणार आणि जिंकणारही असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन राणे यांनी केला. लातूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिवसेनेला 2 जागा हक्काच्या असून, लातूर ग्रामीण गेल्यावेळी 2019 विधानसभेला सुटली होती. त्यामुळे लातूर ग्रामीण तर शिवसेनेचीच जागा आहे आणि ती महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन लढणार, असे दाने म्हणाले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील चिंचोली बल्लाळनाथ, कारेपूर, गोरेगाव, कामखेडा, शिराळा व हारवाडी आदी गावांमध्ये शिवसेनेच्यावतीने गाव भेट दौऱ्यात ते बोलत होते. दाने म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या न्याय्य हक्कासाठी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण मोडीत काढले पाहिजे. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढाई असणार आहे, असेही सचिन दाने म्हणाले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार सेटलमेंट राजकारणाचा बळी ठरली असून कंटाळली आहे. लातूर ग्रामीणमधील जनता उपऱ्या उमेदवाराला कदापि स्वीकारणार नसून त्याविरुद्ध बंड करण्यास मागे पुढे बघणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. लातूरमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जात नसून गुत्तेदारी आणि टक्केवारीचे राजकारण जोरात चालू आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाला योग्य भाव दिला नाही. ऊस सहा सहा महिने नेला नाही. हार्वेस्टर ने 25-30 हजार घेऊन शेतकऱ्यांची लूट केली, असे दाने म्हणाले.
पीकविमा प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प राहिले…
पीकविमा प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प राहिले. त्या काळात आपण स्वतः पुढे होऊन शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी आंदोलन केले हे केवळ लातूर ग्रामीण लोकांनाही माहित आहे दुष्काळात बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली सक्तीने केली हे लोक विसरले नाहीत त्यावेळी आपण पुढे होऊन शेतकऱ्यांच्या शक्तीच्या कर्ज वसुली विरोधात पाऊल उचलल्याने ही वसुली थांबली असा दावाही गाणे यांनी दैनिक ‘देशोन्नती’शी बोलताना केला.