उबाठा २५, काँग्रेस १२, भाजपा १२, राष्ट्रवादी अजित पवार ११ जागावर विजयी…!
परभणी (Parbhani Election Results) : शहर मनपा निवडणूकीचा शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारी नुसार शिवसेना उबाठा, काँग्रेस आघाडीला सर्वाधिक ३६ जागा मिळाल्या आहेत. भाजपा १२ जागावर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सुध्दा ११ जागा मिळाल्या आहेत.
वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात शुक्रवार १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी अतिशय संथगतीने सुरु असल्याने निकाल येण्यास उशीर लागत आहे. दुपारी पावणे तीन वाजता हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना उबाठाला २५, काँग्रेस, १२, भारतीय जनता पार्टी १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ११, यशवंत सेना १ आणि ४ अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.
प्रभाग क्र. १ आणि प्रभाग क्र. १५ मधील निकालावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यामुळे या (Parbhani Election Results) प्रभागाची फेरमतमोजणी सुरु करण्यात आली आहे. या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या अक्षय देशमुख, अतुल सरोदे, नदीम इनामदार, बबलू घागरमाळे, माजी महापौर मीनाताई वरपूडकर, बबलू टाक, रितेश जैन, माजू लाला, आकाश लहाने, कलीम बॉस आदी दिग्गज उमेदवार निवडून आले आहेत.
प्राप्त निकालानुसार पक्षांना मिळलेल्या जागा:
उद्धव सेना २५
भाजप १२
काँग्रेस १२
राष्ट्रवादी ११
यशवंत सेना १
अपक्ष ४




