गोंदिया (Gondia):- शहरात मागील आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मजिप्राच्या वतीने संचालित पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. यामुळे नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी (drinking water) मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे शहरात नाल्यांची सफाई(Cleaning of drains) करण्यात आली नाही, केरकचरा रस्त्यावर पडून आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या मार्गी लावावे तसेच मजिप्राला पत्र व्यवहार करून माहिती घ्यावी, आदि मागण्यांना घेवून शिवसेना शहर शाखेच्या वतीने मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
पाणी, साफसफाई व इतर समस्या मार्गी लावा
शहरात विविध समस्यांना निर्माण झाल्या आहेत. मान्सूनपुर्व(Monsoon) सफाईची कामे व्यवस्थितपणे करण्यात आली नाहीत. अनेक वॉर्डातील नाल्या कचर्याने तुंबल्या आहेत. ज्या नाल्यांची साफसफाई झाली. तेथील कचरा उचल करण्यात आला नाही. यामुळे कचरा रस्त्यावर पडून आहे. यामुळे शहरातील अनेक वॉर्डात अस्वच्छता (unsanitary) निर्माण झाली असून दुर्गंधीने नागरिकांचे राहणे कठीण होऊन बसले आहे. पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव (Mosquito infestation) वाढला आहे. हा सर्व प्रकार शहरात रोगराईला निमंत्रण देणारा आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे अनेक वॉर्डात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शुध्द पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या सर्व समस्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरात पालिकेच्या कारभाराला घेवून रोष निर्माण झाला आहे.
मजिप्राला पत्र पाठवून पाणी पुरवठ्याला घेवून जाब विचारण्यात यावा
प्रशासनाने पुढाकार घेवून शहरातील समस्या मार्गी लावाव्यात, मजिप्राला पत्र पाठवून पाणी पुरवठ्याला घेवून जाब विचारण्यात यावा, आदि मागण्यांना घेवून शिवसेना (Shiv Sena) शहर संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिकेवर धडक(strike) दिली. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. आगामी दिवसात समस्या मार्गी लागल्या नाही, तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश कनोजिया, शहर संघटिका महिला प्रमुख रुपाली रोटकर, तालुका समन्वयक संजु शमसेरे, ताराचंद कनोजिया, शहर उपप्रमुख राहुल मिश्रा, माही बंजारे, जुबेर खान, बोरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते