देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/ बुलढाणा (Kavad yatra) : येथील महाकाल शिव मंदिर खडकपुरा वस्तीतील शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही संपूर्ण चिखली शहरातून भव्य कावडयात्रा मिरवणुक काढली. या (Kavad yatra) कावड यात्रेत शिवभक्तांसोबत मोठया संख्येने शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा नगरध्यक्ष यांनी सहभाग घेतल्याने या (Kavad yatra) कावड यात्रेस यंदा खऱ्या अर्थाने भव्य यात्रेचे स्वरूप आले होते.
मिरवणुकीत शिवभक्तांनी आपापल्या कलशांमध्ये जल भरून कावड खांद्यावर घेत बँडच्या तालावर सर्व (Kavad yatra) कावड यात्री उत्साहात वाजत गाजत व नाचत शिवघोषात मार्गस्थ झाले. यावेळी माजी आमदार राहूल बोंद्रे, माजी नगरध्यक्ष कुणाल बोंद्रे, प्रियाताई बोंद्रे तथा विविध मान्यवरासह कार्यक्रमांचे आयोजक सिध्देश्वर शर्मा व दीपक काळे, गजू राऊत, सचिन जोशी, राहुल सपकाळ, मनोज जासूद, गजानन जायलवाल, संदीप सुरोशे, राम डहाके, गजू भाऊ उगले, पिनू गवई, विकास गुंजाळकर, शैलेश भाऊ उबरहांडे, आश्विन वेंडोले, विभाताई काळे, ज्योती शर्मा ,सीमाताई वेडोले,पुजा ताई जायलवाल, वंदना राऊत, इशिका शर्मा, हाके ताई,भाग्यश्री जासुदकर,जया उबरहांडे, देवका रामावत, रेखा शर्मा, माधुरी जोशी, रंजना जाधव, गौरी सपकाळ, मनीषा बोंद्रे,निकिता शेवाळे, प्रीती गुंजाळकर, छाया गुंजाळकर, पुष्पा घाडगे,व संपूर्ण खडकपुरा महिला मंडळ व चिखली शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक महिलां मोठ्या संख्येने कावड यात्रेत सहभागी झाल्या असून महिला मंडळाचे नियोजन पूजाताई जायलवाल यांनी केले.