दर्यापूर (Shivaji Education) : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहार्षि डॉ. भाऊसाहेब देशमुख (Dr. Bhausaheb Deshmukh) यांच्या शिक्षण संस्था उद्देश संकल्पनेतील संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे द्वारे प्राप्त प्राविण्य हेच डॉ, भाऊसाहेबांच्या शिक्षण गंगेचे सामर्थ्य ठरते, असे मार्मिक प्रतिपादन स्थानिक गाडगेबाबा मंडळाचे सदस्य तथा तालुक्यातील जैनपूर ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच प्रभाकर भालचंद्र उपाख्य बाप्पूसाहेब कोरपे यांनी महाविद्यालयातील पर्यावरण सेवा कार्याचा तथा शासन दरबारी पेंटेट नोंदणी करणाऱ्या प्राध्यपकांचा (Gadgebaba Mandal) गाडगेबाबा मंडळाच्या वतीने सत्कार करतांना केले.
जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाच्या दैप्यमान कार्याचा गाडगेबाबा मंडळाद्वारे गौरव
महाविद्यालयात कार्यरत प्रा. डॉ निलेश राजेंद्र किसवे यांनी नॅनो पार्टीकल्स ऑब्झरवेशन डिव्हाइस निमिर्ती व प्रा. डॉ पंकज कास्टे यांनी ॲग्रीकल्चरल ड्रोण फॉर प्रेस्टीसाईड स्प्रे निर्मिती याबाबत संशोधनाद्वारे शासन पेंटेंट मिळवून लौकीक प्राप्त केलेला आहे. तसेच (Shivaji Education) महाविद्यालयाने प्राचार्य डॉ अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनात आपल्या परिसरात निर्माण केलेले औषधी वनस्पती व फ्लोवर उद्यान हे पर्यावरण पूरक कार्य मोलाचे ठरत आहे. या कार्यासाठी महाविद्यालयाने विविध देश – विदेश नामांकित संस्थेसोबत सामंजस्य करार केलेले असून ही बाब उल्लेखनिय ठरत आहे. समाजाला प्रेरीत करणाऱ्या महाविद्यालयाच्या या बहुमूल्य कार्याची नोंद घेऊन गाडगेबाबा मंडळाने त्यांचा यथोचित गौरव केला.
औषधी वनस्पती उद्यान निर्मिती व पेटेंट नोंदणी बाबत अभिनंदन वर्षाव
पर्यावरण सेवाकार्यात समाविष्ट औषधी वनस्पती व फ्लोवर उद्यान निर्मिती तसेच अथक परिश्रमातून मिळविलेले शासनाचे पेंटेंट प्रमाणपत्र ह्याबाबी अतीशय प्रेरणादायी व महत्वपूर्ण ठरत असल्याने हा गौरव समारंभ आयोजित केल्याचे प्रतिपादन (Gadgebaba Mandal) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार प्राप्त असलेले गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी याप्रसंगी केले. परिसरातील औषधी वनस्पती उद्यानात प्राचार्य डॉ अतुल बोडखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गौरव समारंभाप्रसंगी डॉ. विजय येलकर , डॉ तुषार वानखडे, डॉ. रवि गावंडे इत्यादी प्राध्यापक वृंद तथा निलय अढाऊ, सुनिल काळे व गजानन तराळ इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.