आ. समीर मेघे यांना जाहीर समर्थन
बुटीबोरी (MLA Sameer Meghe) : हिंगणा मतदार संघातील देवळी (गुजर) ग्रामपंचायतचे माजी सरपंच व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी शिवाजी झाडे (Shivaji Zade) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी आमदार सागर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यावेळी, झाडे यांच्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे सदस्य अनिल मसराम, प्रभाकर कुंभरे, दामू वरखाडे, रवींद्र मडावी, राष्ट्रपाल नैताम, मनोज वाघाडे, साहिल पंधराम, दत्तू सहारे, झिबल सोनवाने यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह पक्षप्रवेश करीत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांना समर्थन जाहीर केले. पक्षप्रवेश प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आकाश वानखेडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप माथनकर, बुटीबोरी मंडल अध्यक्ष अनिल ठाकरे, युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंजली कानफाडे, स्मिता मेघे (MLA Sameer Meghe) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उद्या ना. देवेंद्र फडणवीस यांची वाडीत जाहीर सभा
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जाहीर सभा बुधवार, दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजता वाडी येथील गजानन सोसायटी क्रीडा मैदान, दत्तवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, मनसे, रयत क्रांती यांच्याद्वारे करण्यात आले आहे.