हिरेमठ संस्थानमध्ये शिवदीक्षा सोहळा
औसा (Shivdiksha ceremony) : औसा येथील हिरेमठ संस्थांच्या 84 व्या वार्षिक महोत्सव व शिवदीक्षा सोहळ्यानिमित्त बुधवार दि 31 ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र उज्जैन पीठाचे श्रीमद जगतगुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील हजारो शिवभक्तांनी इष्टलिंग महापूजा करून शिवदीक्षा घेतली.
हिरेमठ संस्थांचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी आठ दशकापूर्वी वार्षिक महोत्सव आणि शिव दीक्षा सोहळ्याचे सुरुवात केली होती. वीरशैव भक्तामध्ये धर्मजागृती व्हावी म्हणून त्यांनी सुरू केलेली अखंड परंपरा कायम राखत संस्थानचे मार्गदर्शक डॉ.शांतिवीर शिवाचार्य महाराज व विद्यमान पिठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांनी अविरतपणे चालू ठेवली आहे.
गुरु पौर्णिमेपासून सुरू झालेल्या महारुद्राभिषेक शिवभजन ,शिवकथा शिव कीर्तन, आणि नित्य महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. धर्मानेच विश्वाला शांती मिळेल या उद्देशाने हिरेमठ संस्थांच्या सुरू असलेल्या धर्मजागृती अखंड परंपरेमुळे संस्थांचा नावलौकिक वाढला आहे. श्रीक्षेत्र उज्जैन पिठाचे जगद्गुरु यांच्या अमृतवाणीतून धर्मसभेला त्यांनी संबोधित करीत आशीर्वाचनाची अमृत पर्वणी भाविक भक्तांना दिली.
बुधवारी आयोजित केलेल्या ईस्टलिंग महापूजा व शिव दीक्षा सोहळ्यानिमित्त मागील आठ दिवस संगीतमय शिव कथेतून एक भक्तांना मंत्रमुग्ध करणारे स्वरसम्राट श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर, आमदार अभिमन्यू पवार,सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर वीरसेवा समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष मुक्ता यांनी श्रीमद जगद्गुरु यांचे आशीर्वाद घेतले.
संस्थांच्या वार्षिक महोत्सव व शिवदीक्षा सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वीरशैव समाज औसा वीरशैव युवक संघटना औसा, विजयकुमार मिटकरी, रमेश अप्पाराव राचट्टे, नागेश टिळेकर, रेवणसिद्ध भागुडे, शांतीरप्पा मुरगे ,राजाभाऊ नागराळे, चंद्रशेखर कुरले यांच्यासह वीरशैव समाजाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.