दारव्हा (यवतमाळ):- गेल्या आठ वर्षांपासून पालिकेची रखडलेली पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू करण्यासाठी शहरात गुरुवार दि. ३० मेला सकाळी ११. ०० वाजता दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शहरात हातात कटोरे घेऊन डफडी वाजवत लाऊड स्पीकर लावून शहरात भीक मागितली . एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर नगरपालिकेचा शासकीय क्यू आर कोड(QR code) टाकून यावर सुद्धा पालिकेला भीक स्वरूपात पैसे देण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पाणीपुरवठा करण्यासाठी 34 कोटी 34 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 34 कोटी 34 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना (Plan) मंजूर करण्यात आली. परंतु गेल्या आठ वर्षापासून या योजनेचे काम अपूर्णच आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी म्हणून 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तरीसुद्धा शहरातील नागरिकांना एक थेंब पाणी सुद्धा मिळालेले नाही दर उन्हाळ्यात शहरात भीषण पाणीटंचाईचा(water shortage) सामना नागरिक करीत आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेवरून नागरिकांत मोठा रोष आहे. सदर योजना कमिशनबाजी मुळे पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यामुळे पालिकेला शहरात भीक मागून पैसे जमा करण्यासाठी उबाठाच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. जमा झालेली रक्कम मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या कक्षात देण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी यांनी तेथून पलायन(Escape) केले.
सुद्धा रक्कम स्विकारण्यास नकार
त्यामुळे पालिकेचे अधिक्षक नजीर यांच्याकडे संबंधित जमा झालेली रक्कम दिली असता त्यांनी सुद्धा रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर पाणीपुरवठा अभियंता संदिप गायकवाड यांनी सुद्धा रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर रोखपाल सुट्टी वर असल्याचे सांगण्यात आल्याने भिक मागून जमा केलेली रक्कम स्विकारण्यास पालिकेने टाळाटाळ केली तेव्हा बराच वेळ नगरपालिकेत गोंधळ झाला. त्यानंतर संतप्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी जमा झालेली रक्कम मुख्याधिकारी यांच्या टेबलावर ठेवून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
रक्कम स्विकारण्यास पालिकेने टाळाटाळ केली तेव्हा बराच वेळ नगरपालिकेत गोंधळ
यावेळी उबाठा शिवसेना (Shivsena) पक्षाचे तालुका प्रमुख संतोष ठाकरे,शहर प्रमुख अमोल दुधे, माजी नगरसेवक रवि तरटे, शहर संघटक विजय डांगरा, अल्पसंख्याक आघाडी तालुका प्रमुख वहिद खासाब , शहर प्रमुख मो.दानिश, युवासेना शहर प्रमुख विक्की जामणकर, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख क्रिष्णा निंबर्ते, शिवशक्ती भिमशक्ती शहर प्रमुख किसनराव गायकवाड, विभाग प्रमुख गजानन केंबल, प्रकाश खडसे, संतोष भोयर, अनिल महाराज जामगडे, अजिंक्य निमकर, संदिप शिले, राज धांदे, हेमंत दुधे, शुभम निमकर, यश तिरमारे, प्रेम निमकर, गजानन निमकर, दिपक शिवधारकर, राजू ढोरे, शंकर वयले, प्रतिक कवळकर, गणेश महल्ले आदी शिवसैनिक (Shiv Sainik)यावेळी उपस्थित होते.