कु. अनुसया चा गावात जाऊन केला सत्कार, सर्व समाजाने आदर्श घेण्यासारखं कार्य
पुसद (VidhanSabha ShivSena) : तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या जमिनी ( धुंदी ) येथील अत्यंत सामान्य गोरगरीब प्रसंगी मोळ्या विकून आपल्या मुलीला शिक्षण देणाऱ्या तुळशीराम देवराव व्यवहारे सौं. रुखमाबाई तुळशीराम व्यवहारे यांची मुलगी कु. अनुसया तुळशीराम व्यवहारे ची यशोगाथेला सन्मानाची भेट देण्यासाठी व तिचा व तिच्या आई-भाऊ या सर्वांचा भावपूर्ण सत्कार करण्यासाठी येथील पुसद विधानसभा (VidhanSabha) संपर्कप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल जाधव (Vishal Jadhav), पुसद विधानसभा संघटक विजय बाबर, पत्रकार दीपक महाडिक, निखिल दशरथे, रामेश्वर राऊत, चालक शुभम मिश्रा इत्यादींनी तुळशीराम व्यवहारे यांच्या घरी जाऊन ” कु. अनुसया व्यवहारे ” (Anusaya Vyavhare) हिचा सहकुटुंब भावपूर्ण सत्कार केला.
याप्रसंगी असंख्य गावकरी उपस्थित होते. कु. अनुसया (Anusaya Vyavhare) हिने अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब प्रसंगी आई-वडील भाऊ यांनी शेतमजुरी करून मोळ्या आपल्या बहिणीला आपल्या मुलीला शिक्षणासाठी पैसा उपलब्ध करून दिला. तर त्या मुलीनेही याची जाण ठेवत खडतर शिक्षणाचे धडे घेत तब्बल आठ परीक्षांमध्ये यशस्वी पणे पास होऊन आई-वडिलांचा व भावांचा विश्वास सार्थकी लावला. तीन वेळा पीएसआय ची परीक्षा पास झाली.
तर अनेक ठिकाणी तिची राखीव जागेवर नियुक्ती होऊन तिने उदारमताने जनरल कोट्यातून यश प्राप्त केले. जेणेकरून राखीव जागेवर दुसऱ्या कोणत्याही मुलीला नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरिता तिने जनरल कोट्यातून नोकरी प्राप्त केली. तिची तेल्हारा येथे सध्या महिला व बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे हे विशेष. याप्रसंगी आई वडील, भाऊ किशोर तुळशीराम व्यवहारे, काका सुभाष व्यवहारे, काका तुकाराम व्यवहारे, शांतिनाथ व्यवहारे, आजी चंद्रभागा व्यवहारे, जयदेव बोडखे, शोभा राठोड, राजू राठोड, काकू उज्वला तुकाराम व्यवहारे, रूपा सोंगे इत्यादी उपस्थित होते.