प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, खा. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती
परभणी/पाथरी (Shivswarajya Yatra) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार १७ ऑगस्ट रोजी या यात्रेचे पाथरी शहरात आगमन होणार आहे .स्वागतासाठी माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली पाथरी विधासभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोरदार तयार करण्यात आली आहे.
सभेसाठी भव्य सभा मंडपाची उभारणी
राकाँ शरदचंद्र पवार पक्ष वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रा निघाली असून ही यात्रा शनिवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाथरी शहरात दाखल होणार आहे .यावेळी शहरातील जिल्हा परिषद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खा. सुप्रियाताई सुळे, खा. अमोल कोल्हे, खा फौजिया खान आ. राजेश टोपे , जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे , मा.आ.विजय भांबळे ,मा.आ. सिताराम घनदाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आमदार दुर्राणी यांच्याकडून सभा स्थळाची पाहणी
शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताची पाथरी शहरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्हा परिषद मैदानावर भव्य पाणीरोधक सभा मंडप उभारण्यात आला आहे. दरम्यान शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतासाठी होत असलेल्या तयारीची पाहणी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली. यावेळी त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती. सभेसाठी पाथरी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार असल्याचे पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.