हिंगोली(hingoli):- शहराजवळील लिंबाळा मक्ता येथे माहेराहून पीकअप घेण्यासाठी ७ लाख रूपये आणण्याकरीता २२ वर्षीय विवाहितेस विजेचा शॉक (Shock)देऊन मारल्याने सासरच्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेराहून ७ लाख रूपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ केला जात
याबाबत पोलिसांनी दिलेली मााहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील शेख अब्दूल शेख मदार यांची मुलगी नाजीयाबी हिचा विवाह(marriage) हिंगोली तालुक्यातील पळसोना येथील शेख हुसैन उर्फ न्यामत शेख अहेमद याच्यासोबत मागील चार वर्षापूर्वी झाला होता. विवाहानंतर नाजीयाबीला चांगले वागविण्यात आले. कालांतराने तिला सासरच्यांनी त्रास (trouble) देण्यास सुरूवात केली. हा छळ अधिकच होत असताना शेख हुसैन व नाजीयाबी हे दोघेही लिंबाळामक्ता येथे राहण्यास आले होते. पीकअप खरेदी करण्याकरीता माहेराहून ७ लाख रूपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ केला जात होता.
माहेराहून पैसे आणत नसल्याने तिचा छळ
घरच्यांची परिस्थिती बिकट असल्याने नाजीयाबी माहेराहून पैसे आणत नसल्याने तिचा हा छळ (torture) अधिकच वाढत असताना २२ जून शनिवार रोजी सासरच्यांनी नाजीयाबीला विजेचा शॉक(Electric shock) देऊन तिचा खून(murder) केल्याने शेख अब्दूल शेख मदार यांनी २३ जूनला रात्री उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पती शेख हुसैन उर्फ न्यामत शेख अहेमद, सासरा शेख अहेमद, सासू ताहेराबी शेख अहेमद, दीर शेख इरफान शेख अहेमद, नंनद रूक्साना, नंनद शकीला शेख अहेमद, चुलत सासरा शेख हामीद शेख चाँद सर्व रा.पळसोना यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, असलम गारवे हे करीत आहेत.