अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल!
रिसोड (Shoplifting) : रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) आवारातील चार अडत दुकान फोडून चोरट्यांनी चांदीचे शिक्केसह 45 हजार रुपये चा एवज लंपास केल्याची घटना दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रात्री अडीच वाजताच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी एवज लंपास केला असला तरी मात्र दरवाजे, अलमारी, कपाट, फर्निचर आदीचे मोठे नुकसान केले आहे. चोरीचा (Theft) कमी मात्र नुकसानीचा मनस्ताप अडते यांना सहन करावा लागत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बाजार समिती कार्यालय लगत किसन धनराज अग्रवाल,विजय रामकिसन अग्रवाल,रमेश प्रल्हाद गायकवाड,मंगेश विनोदराव तायडे यांचे अडत दुकान असून अडत दुकाने दीपावलीची रात्री पूजा अर्चना करून आपापल्या घरी निघून गेले. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी बाजार समितीचे सिक्युरिटी गार्डने त्यांचे आडत दुकान चे दरवाजे तुटलेले असल्याची माहिती दिली. यावरून ताबडतोब दुकानावर येऊन पाहणी केली असता सदर प्रकार समोर आला. चोरट्यांनी किसन अग्रवाल यांच्या दुकानातून सात हजार रुपयाची रोख रक्कम, विजय अग्रवाल यांचे आडत दुकानातून 11000 ची रोख रक्कम, रमेश गायकवाड यांचे आडत दुकानातून 10 हजार 800 रुपयांची रोख रक्कम व 10 ग्राम वजनाचे 6 चांदीचे शिक्के असा एकूण पंधरा हजार तीनशे चा एवज तर मंगेश तायडे यांचे 2000 व तसेच त्यांचे पार्टनर रवी जाधव यांचे दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 45 हजार 300 रुपयाचा ऐवज लंपास केला असून रिसोड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
