चौथ्या सोमवारी श्रीक्षेत्र औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी उसळला जनसागर
औंढा नागनाथ/हिंगोली (Aundha Nagnath) : चौथ्या श्रावण सोमवार व गोकुळाष्टमीनिमित्त नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी अलोट गर्दी केली. दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यात विदर्भातील नांदेड हिंगोली परभणी लातूर वाशिम औरंगाबाद बीड आधी महाराष्ट्रातील भागातील भाविकांची यात मोठी दर्शनासाठी अलोट गर्दीचा उसळला जनसागर (Aundha Nagnath) नागनाथ मंदिरात ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेवाच्या जय घोषणाने मंदिर परिसर दुमदुमून गेले. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना पवित्र समजला जातो. या अनुषंगाने देशातील आठव्या ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ याची मंदिर जगप्रसिद्ध आहे.
येथील चौथ्या श्रावण सोमवारी पर्वावर 26 ऑगस्ट रोजी नागनाथ संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे व नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख यांनी महापूजा केली. (Aundha Nagnath) महापूजा झाल्यानंतर मध्यरात्री दोनच्या दरम्यान भाविकाच्या दर्शनासाठी मंदिर खुल्ले करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे अध्यक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ गार्ड प्रमुख बबन सोनवणे कृष्णा पाटील नागेश माने रामप्रसाद उदगीरे जगदेव दिंडे यासह नागनाथ संस्थांचे कर्मचारी दिवसभर मंदिरात होते.
दिवसभरात लाखोच्या आसपास शिवभक्ताने चौथ्या सर्वांसमवारी निमित्ताने श्री चे दर्शन घेतले. यावेळी (Aundha Nagnath) नागनाथ मंदिरात बम बम बोले हर हर महादेव जय गोसावी मंदिर परिसर भक्तीमय वातावरण झाले. नागनाथ देवस्थानच्या वतीने भाविकासाठी व्यवस्था दर्शनाची केली. चौथ्या सोमवारी नागनाथाचे भाविकाचा उसळला होता जनसागर जणू काही पंढरपूरी अवतरली असे दिसून आले. ‘बम बम बोले’ च्या गजरात औंढा नगरी दुमदुमली होती. यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहीरे पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे पंजाबराव थिटे संदीप टाक शेख महंमद आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.