औंढा नागनाथ/हिंगोली (Shravan Month) : देशातील आठवे ज्योर्तिलिंग असलेल्या (Aundha Nagnath) औंढा नागनाथ येथे ५ ऑगस्टला पहिल्या श्रावण सोमवारी (Shravan Month) भाविकांची मोठी मांदियाळी होणार आहे. श्रावण निमित्ताने रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार हरीष गाडे यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर पहाटे २ वाजता भाविकांसाठी मंदीर खुले केले जाणार आहे. प्रत्येक भाविकांना रांगेद्वारे दर्शन मिळणार आहे.
मंदिरासह परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून १२५ पोलिस कर्मचारी, ३० स्वयंसेवक व संस्थानचे ६० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. आज पहिल्याच श्रावण सोमवारी (Shravan Month) जवळपास १ लाखाहून अधिक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुमारे २१ तास मंदीर दर्शनासाठी उघडे ठेवले जाणार आहे.