देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Shree Shivaji High School) : अमरावती शिवाजी शिक्षण संस्थेने शाळा तपासणी अधिकारी तथा सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे आणि सेवानिवृत्त प्राचार्य विखे यांच्या संकल्पनेतून, तथा संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बु येथील (Shree Shivaji High School) श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये १५ ऑक्टोबर रोजी वर्ग ५ ते ८ च्या विध्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिरीक्त सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
चिखली तालुक्यातील मेरा बु येथे पाचवी ते बारावी पर्यत एकमेव असलेले (Shree Shivaji High School) श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे या संस्थेवर प्राचार्य पी एस इंगळे, पर्यवेक्षक पी डी खरात, तथा १८ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळेतील वर्ग ५ ते ८ च्या विध्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थांचे जनरल नॉलेज वाढवणे, स्पर्धा परीक्षांचे महत्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत अधिकाधिक मुले चमकवणे , इग्रजी , मराठी , गणितात विद्यार्थी कमकुवत आहेत.
अशा (Shree Shivaji High School) विद्यार्थ्यासाठी किमान कौशल्य , वाचन, लेखन, आकलन, गणितीय क्रिया प्रत्येक विद्यार्थ्याला याव्यात यासाठी अतिरिक्त सराव परीक्षेचे विशेष नियोजन करून प्रगत गट व अप्रगत गट असे विभाजन करून त्यांचे अतिरिक्त वर्ग घेऊन किमान कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रारंगत करणे व त्याचे मुल्यांकन प्रत्येक सत्रातून पायाभूत परीक्षा घेणे व त्यातून विध्यार्थ्यांचे मुल्यमापन करून त्यांना अतिरिक्त वर्ग घेऊन मार्गदर्शन करणे, गुणवत्ता पूर्ण उपक्रमांचे आयोजन करून १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ ते ८. विध्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी, गणित या विषयावर सराव परीक्षा घेण्यात आली.
यावेळी (Shree Shivaji High School) शाळेचे मुख्याध्यापक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक पी डी खरात , बुधवत सर , पवार सर, बोडखे सर, इंगळे सर , प्रशांत सर, पडघान सर, मोहोड सर , पुंनकर मॅडम, नागरे मॅडम, शिपाई अनिल जाधव आदी शिक्षकांची उपस्थीती होती .