हिंदू बाजूच्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी करणार
अलाहाबाद (Shri Krishna Janmabhoomi) : मथुरेच्या प्रसिद्ध श्रीकृष्ण जन्मभूमी (Shri Krishna Janmabhoomi) आणि शाही इदगाह प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद प्रकरणी (Muslim Party) मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहे. मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळण्याचा हा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज गुरुवारी 01 ऑगस्ट रोजी देण्यात आला.
माहितीनुसार, या प्रकरणी हिंदू बाजूने 18 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये शाही इदगाह मशिदीची जमीन हिंदूंची असल्याचे म्हटले होते. यासोबतच हिंदू पक्षाने तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी केली होती. त्यानंतर (Muslim Party) मुस्लिम बाजूने हिंदू बाजूच्या याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली. मुस्लिम पक्षाने प्रार्थनास्थळ कायदा, वक्फ कायदा, मर्यादा कायदा आणि विशिष्ट ताबा सुटका कायदा यांचा हवाला देत (Allahabad High Court) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Muslim Party) मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली. त्याच वेळी, उच्च न्यायालयाने सांगितले की, हिंदू बाजूने दाखल केलेल्या 18 याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी केली जाईल. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने (Allahabad High Court) हा निर्णय दिला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी ही याचिका दाखल केली होती.
माहितीनुसार, याचिकेत शाही इदगाह मशिदीची रचना हटवून जागा ताब्यात देण्याची आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, (Shri Krishna Janmabhoomi) भगवान कृष्णाच्या जन्मस्थानी बांधलेले मंदिर कथितरित्या पाडल्यानंतर (Mughal Emperor Aurangzeb) मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली, असल्याचा दावा करण्यात आला आहे.