आ. संजय गायकवाड यांनी दिलेले आश्वासन पूर्ण
बुलडाणा (MLA Sanjay Gaikwad) : एका वर्षाच्या बहुप्रतिक्षेनंतर शासनाच्या वतीने अखेर श्री परशुराम (Shri Parashuram) आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. सदर घोषणा सोमवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केल्याने जिल्हयासह राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या वतीने बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
जिल्हयात एका वर्षापूर्वी शहरात श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त (Shri Parashuram) आयोजित कार्यक्रमादरम्यान बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी राज्यभरातील समस्त ब्राम्हण समाजाची अवस्था पाहता त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्रपणे श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर मागणीचा पाठपुरावा करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या विषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती.
सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा यासाठी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी नुकतचे बुलडाणा दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री शिंदेकडे पुन्हा लावून धरली होती. यावर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा विषय आपल्या लक्ष्यात असल्याचे सांगत या महामंडळाची घोषणा लवकर होईल, असे सांगितले होते. आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये श्री परशुराम (Shri Parashuram) आर्थिक विकास महामंडळाचा विषय हाताळत सदर घोषणा केली, याची माहिती बुलडाणा जिल्हयात मिळताच विविध ठिकाणी ब्राम्हण समाजाच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटपकरुन या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी बुलडाणा आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचे देखील आभार व्यक्त केले.