देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Shweta Mahale ) : गेल्या काही वर्षांपासून माजी सरपंच सुनील पडघान हे गावांसाठी कायमस्वरूपी म्हणून विज उपकेंद्र मिळण्यासाठी प्रयत्न करत होते .या मागणीला चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले (Shweta Mahale) यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मेरा बु साठी विज उपकेंद्र मंजूर करूण घेतले आहे.
तालुक्यांतील मेरा बु गावाला मिळणारा विज पुरवठा (Electricity supply) वारंवार विस्कळीत होत असल्याने तासनतास लोकांना अंधारात राहावे लागत असे . तसेच शेती पंपांना पुरेसी विज मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते ही परिस्थीती पाहून मेरा बु चे माजी सरपंच पती सुनिल पडघान यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटिल यांच्याकडे विज उपकेंद्र मिळण्यासाठी प्रयत्न केला आणि लगेच आमदार श्वेताताई (Shweta Mahale) यांचा मतदार संघ चिखली असला तरी त्यांचे माहेर दे राजा विधानसभा मतदारसंघात असलेले मेरा बु हे आहे .त्यामुळे त्यांनी तात्काळ शासनाकडे पाठपुरावा करून विज उपकेंद्र मंजूर करूण घेतले आहे.
याबाबत माजी सरपंच पती सुनिल पडघान यांनी सागितले की मेरा बु येथे विज केंद्र उभारणीसाठी सहा गुंठे शासकिय जागेवर लवकरच कामाला सुरवात होणार असून शेती पंपांना व गावकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा (Electricity supply) होणार आहे, असे दै. देशोन्नती शी सांगण्यात आले.