हिंगोली(Hingoli):- मुसळधार पावसाने सिद्धेश्वर येथील धरणात पाण्याची आवक वाढली कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडणार नदीकाठच्या गावांना धरण प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा दिला होता. सायंकाळी धरणातील (Dam) पाणीसाठा वाढल्याने धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.
पाणीसाठा वाढल्याने धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rain) सिद्धेश्वर धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे धरण प्रशासनाच्या वतीने पूर्णा पाटबंधारे विभाग (Irrigation Department) वसमतचे कार्यकारी अभियंता यांनी पूर्णा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिनांक एक सप्टेंबर रविवार रोजी दुपारी तीन वाजता दिला होता. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून हे पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.