हिंगोली (Siddheshwar dam) : शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या (Siddheshwar dam) धरणाजवळ पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होती. तसेच पाईपही कुजला होता. त्यामुळे हिंगोली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २१ व २२ ऑगस्ट दरम्यान दोन दिवस दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले.
आगामी काही दिवसात अनेक सण व उत्सव आहेत. या दरम्यान पाणी पुरवठ्याची आरडा ओरड होऊ नये व कोणत्याही दिवशी पाणी पुरवठा खंडीत होऊ नये. या उद्देशाने नगर पालिका पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने यापूर्वीच २१ व २२ ऑगस्टला शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद ठेवल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या दोन दिवसात सिद्धेश्वर धरणा जवळील पाईपमधून मोठ्या प्रमााणात होणारी पाण्याची गळती तसेच कुजलेले पाईप दुरूस्त करण्यात आले.
न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे यांच्यासह नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी घटनास्थळी जाऊन दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. या दोन दिवसामध्ये नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता वसंत पुतळे यांच्यासह शेख शकील, अमोल पाटोळे, शिवाजी जाधव, पिंटू मोटे आदी दोन दिवसापासून तळ ठोकून आहेत. (Siddheshwar dam) पाण्याच्या गळतीचे काम जवळपास अंतीम टप्प्यात आले असून, लवकरच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत चालू होणार आहे.