लहान स्कर्ट, फाटलेल्या जीन्स घालून येणाऱ्यास ‘प्रवेश बंद’
मुंबई (Siddhivinayak Temple) : दररोज शेकडो भाविक मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. या मंदिरात केलेल्या सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करतात, असे मानले जाते. मात्र, आता सर्वांना सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याचे कारण म्हणजे, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी (dress code) ड्रेस कोड ठरवून दिला आहे. आज (Siddhivinayak Temple) श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट (SGTT) ने भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करणारा एक नवीन आदेश जारी केला आहे.
जर तुम्ही असे कपडे घातले असतील तर प्रवेश नाही
या आदेशानुसार, लहान स्कर्ट आणि लहान कपडे घालून (Siddhivinayak Temple) मंदिरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार, लहान स्कर्ट, फाटलेल्या जीन्स, लहान आणि (dress code) उघड्या पोशाखांमध्ये मंदिरात येणाऱ्या मुली, महिला आणि पुरुषांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
#WATCH | Maharashtra | Devotees visit Shree Siddhivinayak Temple in Mumbai as morning Aarti being performed at the temple on the first day of the year 2025. pic.twitter.com/AHOQEJPwdA
— ANI (@ANI) January 1, 2025
भाविकांना पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करावा
ट्रस्टने स्पष्टपणे म्हटले आहे की, केवळ सभ्य आणि पारंपारिक कपडे परिधान केलेल्या भाविकांनाच (Siddhivinayak Temple) मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराने लोकांना पारंपारिक भारतीय पोशाख घालून मंदिरात येण्याची विनंती केली आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हा नियम का लागू केला?
मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या तक्रारींनंतर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हा ड्रेस कोड (dress code) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कपड्यांमध्ये (Siddhivinayak Temple) मंदिरात येणाऱ्या लोकांमुळे इतर भाविकांना अस्वस्थता वाटते, असे ट्रस्टने म्हटले आहे.
वृंदावन मंदिरातही या पोशाखावर बंदी
मुंबईतील (Siddhivinayak Temple) सिद्धिविनायक मंदिरापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये, मथुरा वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरानेही भाविकांना हाफ पँट, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फ्रेट जीन्स, चामड्याचे कपडे किंवा इतर कपडे, (dress code) अश्लील आणि आक्षेपार्ह कपडे घालून मंदिरात येण्यास बंदी घातली होती.
भाविकांनी नेहमीच ड्रेस कोडचे पालन करावे
मंदिर ट्रस्टने सांगितले की, (Siddhivinayak Temple) मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कपड्यांबाबत आम्हाला इतर भाविकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. मंदिरात अशा कपड्यांवर बंदी घालण्याची विनंती भाविकांनी ट्रस्टला केली होती. आता भाविकांना सर्व परिस्थितीत ट्रस्टचा हा नियम पाळावा लागेल.