बुलडाणा(Buldhana):- आघाडीच्या राजकारणात बंडखोरी काही शमायला तयार नाही, मेहेकर विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) हा शिवसेना उबाठा. ला सुटल्याने स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, त्यांनी शुक्रवार 25 ऑक्टोबरला मेकर तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यात लक्ष्मणदादा घुमरे यांचा एक काँग्रेसचा व एक अपक्ष म्हणून दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, विशेष म्हणजे, घुमरे हे कट्टर वासनिकनिष्ठ आहेत !
वासनिकनिष्ठ लक्ष्मणदादा घुमरे भरणार अर्ज !
तालुका काँग्रेस (Congress)कमिटीचे कार्यालयात ही बैठक नंदूभाऊ बोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मेहकर मतदार संघातील काँग्रेसच्या चार नेत्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली होती. आमच्यापैकी कोणालाही उमेदवार म्हणून द्यावी, व हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवावा.. म्हणून त्यांनी अथक प्रयत्न पक्षपातळीवर व हायकमांडकडे केले. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या उबाठा पक्षाकडे गेला आहे .त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली. या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करत असताना काँग्रेस पक्षावर अन्याय झाल्याचे तसेच या मतदारसंघातील नेते लक्ष्मणदादा घुमरे यांच्यावर अन्याय झाल्याचे नमूद करून आपण ही निवडणूक लढवावी, आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत तनमनधनाने आम्ही आपणास मदत करू. अशा पद्धतीचे प्रत्येकाने आपले मत व्यक्त केले. लक्ष्मणदादा घुमरे यांनी पक्षाचा व अपक्षाचा फॉर्म भरावा, अजून काही दिवस वेळ आहे पुन्हा काही जागावर बदल होत आहेत व तसे न झाल्यास निवडणूक लढवावी, अशा पद्धतीचे आवाहन सगळ्यांनी केले.
लक्ष्मण घुमरे यांचा 28 तारखेला काँग्रेस पक्षाचा व अपक्षाचा फॉर्म भरण्याचा निर्णय
यावेळी सर्वश्री नंदूभाऊ बोरे,वसंतराव देशमुख नाझीम भाई कुरेशी, देवानंद पवार, भास्करराव ठाकरे, संतोषराव नरवाडे, अभिमन्यू नवले, विनायक टाले, डॉ. शेषराव बदर, साहेबराव खंडारे, ज्ञानेश्वर काठोळे, राजाराम वाटसर, वामनराव मोरे, भानुदास अजगर, दिलीप बो, भूषण काळे, प्रकाश देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, संजय सुळकर, विश्वास दुतोंडे, गणेश विलास गवई, गणेश मोसंबे, श्रीधर लहाने, अशोक उबाळे, संतोष खरात, दिलीप राठोड, दत्ता गिऱ्हे, डॉ. रामेश्वर देशमुख, श्रीचंद पवार, अनिल देशमुख, रमेश राठोड, रमेश तांगडे, तुकाराम चव्हाण इत्यादींनी आपले प्रखर मत व्यक्त केले. सर्वांची मते ऐकून घेऊन आणि सर्वांनी केलेल्या विनंतीला मान देऊन, व तिथे उपस्थित असलेल्या इतरही पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव लक्ष्मणदादा घुमरे यांनी 28 तारखेला काँग्रेस पक्षाचा व अपक्षाचा फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले व आभार नामदेवराव राठोड यांनी मानले.